टाटा समुहाच्या एका शेअरवर एक्सपर्ट बुलिश आहेत आणि तो खरेदी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. टाटा समुहाची ही कंपनी म्हणजे टाटा इलेक्सी (Tata Elxsi). Tata Alexi चे शेअर्स त्यांच्या 2020 च्या नीचांकी पातळीवरून जवळपास 1,800 टक्क्यांनी वाढले आहेत. तज्ज्ञांचे मते चार्ट पॅटर्ननुसार स्टॉक अजूनही वाढण्याची शक्यता आहे.
कंपनीचे मार्केट कॅप 59,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 25 मार्च 2020 रोजी 501 रूपयांची नीचांकी पातळी गाठल्यानंतर, आता 10 ऑगस्ट 2022 रोजी स्टॉक 9,459 रूपयांवर पोहोचला आहे. तेव्हापासून, या स्टॉकने 1,800 टक्के रिटर्न दिला आहे. एका वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या या शेअरनं 9,704 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. दरम्यान, विश्लेषकांनी पुढील सहा महिन्यात हा शेअर 10000 ते 17000 हजारांदरम्यान जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे. तसंच 10 ऑगस्ट 2021 ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत हा स्टॉक 4,238 रुपयांवरून 9,459 रुपयांवर पोहोचला. म्हणजेच वर्षभरात 120 टक्के वाढ झाली आहे.
त्याच वेळी, गेल्या 25 वर्षांमध्ये, या समभागाने 1,23,064.06 टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. 25 वर्षांपूर्वी 11 जुलै 1997 रोजी बीएसईवर या शेअरची किंमत 7.68 रुपये होती. 10 ऑगस्ट 2022 रोजी स्टॉक 9,459 रुपयांवर पोहोचला. या शेअने गेल्या 9 वर्षात 9274.09 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 25 वर्षांपूर्वी 7.68 रुपये दराने 30 हजार रुपये गुंतवले असते आणि आजपर्यंत गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज त्या ३० हजारांचं मूल्य 3.69 कोटी रूपये झाले असते.
(टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)