Lokmat Money >शेअर बाजार > ७ रुपयांवरुन १२०० वर पोहोचला शेअर, कंपनीला मिळालं इलेक्ट्रिक बसचं मोठं कंत्राट

७ रुपयांवरुन १२०० वर पोहोचला शेअर, कंपनीला मिळालं इलेक्ट्रिक बसचं मोठं कंत्राट

एका मोठ्या कंत्राटामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 03:29 PM2023-12-08T15:29:08+5:302023-12-08T15:29:26+5:30

एका मोठ्या कंत्राटामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसतेय.

Share reached 1200 from 7 rupees the company got a big electric bus contract Olectra Greentech investment | ७ रुपयांवरुन १२०० वर पोहोचला शेअर, कंपनीला मिळालं इलेक्ट्रिक बसचं मोठं कंत्राट

७ रुपयांवरुन १२०० वर पोहोचला शेअर, कंपनीला मिळालं इलेक्ट्रिक बसचं मोठं कंत्राट

इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेकचे (Olectra Greentech) शेअर्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक वाढीसह 12792.60 रुपयांवर पोहोचले. ऑलेक्ट्रा ग्रीनटेकच्या शेअर्समध्ये ही वाढ इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्याच्या मिळालेल्या ऑर्डरमुळे झाली आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेकचे शेअर्स गेल्या काही वर्षांत 7 रुपयांवरून 1200 रुपयांपर्यंत वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 1465 रुपये आहे. त्याच वेळी, ऑलेक्ट्रा ग्रीनटेकच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 374.35 रुपये आहे.

ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला वसई विरार महानगरपालिकेकडून 40 इलेक्ट्रीक बसचा सप्लाय आणि मेंटेनंससाठी कंत्राट मिळालं आहे. याचं मूल्य 62.80 रुपये आहे. इलेक्ट्रिक बसेसचा सप्लाय आऊटरायटर सेल बेसिसवर आहे आणि ते 7 महिन्यांत पूर्ण करावं लागेल. कंपनीला सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत 18.58 कोटी रुपयांचा नफा झाला होता. एका वर्षाच्या समान कालावधीमध्ये को 7.58 कोटींनी अधिक आहे.

17000 टक्क्यांपेक्षा अधिक उसळी
ऑलेक्ट्रा ग्रीनटेकच्या शेअर्समध्ये गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. 28 मार्च 2014 रोजी कंपनीचे शेअर्स 7.10 रुपयांवर होते. 8 डिसेंबर 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेकचे शेअर्स 1272.60 रुपयांवर पोहोचले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनं सुमारे 17470 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीनं 28 मार्च 2014 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर या शेअर्सचे सध्याचे मूल्य 1.79 कोटी रुपये झाले असते. गेल्या 3 वर्षांत, ऑलेक्ट्रा ग्रीनटेकचे शेअर्स 1070 टक्क्यांनी वाढले आहेत. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 106.70 रुपयांवरून 1272.60 रुपयांपर्यंत वाढले आहेत. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलीये. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Share reached 1200 from 7 rupees the company got a big electric bus contract Olectra Greentech investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.