Lokmat Money >शेअर बाजार > Share Market Diwali Muhurat Trading 2022: लक्ष्मी देवी शुभ करणार! दिवाळी मुहूर्तावर ‘या’ शेअर्समध्ये पैसे गुंतवा, भन्नाट रिटर्न्स मिळवा

Share Market Diwali Muhurat Trading 2022: लक्ष्मी देवी शुभ करणार! दिवाळी मुहूर्तावर ‘या’ शेअर्समध्ये पैसे गुंतवा, भन्नाट रिटर्न्स मिळवा

Share Market Diwali Muhurat Trading 2022: शेअर मार्केटमध्ये दिवाळीला मुहूर्त ट्रेडिंग केले जाते. या दिवशी गुंतवणूक करणे अतिशय शुभ मानले जाते. तुम्ही कोणते शेअर्स खरेदी करणार? पाहा, डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 04:21 PM2022-10-18T16:21:22+5:302022-10-18T16:23:16+5:30

Share Market Diwali Muhurat Trading 2022: शेअर मार्केटमध्ये दिवाळीला मुहूर्त ट्रेडिंग केले जाते. या दिवशी गुंतवणूक करणे अतिशय शुभ मानले जाते. तुम्ही कोणते शेअर्स खरेदी करणार? पाहा, डिटेल्स...

share stock market muhurat trading 2022 know about date and timing and investment list of stock to buy on diwali trading | Share Market Diwali Muhurat Trading 2022: लक्ष्मी देवी शुभ करणार! दिवाळी मुहूर्तावर ‘या’ शेअर्समध्ये पैसे गुंतवा, भन्नाट रिटर्न्स मिळवा

Share Market Diwali Muhurat Trading 2022: लक्ष्मी देवी शुभ करणार! दिवाळी मुहूर्तावर ‘या’ शेअर्समध्ये पैसे गुंतवा, भन्नाट रिटर्न्स मिळवा

Share Market Diwali Muhurat Trading 2022: दिवाळी, दीपोत्सवाला आता अगदी काही दिवस राहिलेले आहेत. सर्वांनाच आता दिवाळीचे वेध लागलेले आहेत. गुंतवणूकदारांसाठी दिवाळी विशेष असते. कारण शेअर बाजारात दिवाळीला मुहूर्त ट्रेडिंग केले जाते. या मुहूर्त ट्रेडिंगच्या काही तासांत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली जाते. तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर दिवाळीचा मुहूर्त तुमच्यासाठी उत्तम संधी असल्याचे सांगितले जात आहे. 

देशांतर्गत स्टॉक एक्स्चेंज बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज २४ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटांपासून ते ७ वाजून १५ मिनिटांदरम्यान एक तासाचे विशेष 'मुहूर्त' ट्रेडिंग आयोजित केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ब्लॉक डील सत्र संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटे ते ६ वाजेपर्यंतच्या वेळेत होणार असून, प्री-ओपन सत्र संध्याकाळी ६ नंतर होणार आहे. 

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी अतिशय शुभ दिवस

दिवाळीचा दिवस हा शेअर बाजारासाठी खूप खास मानला जातो. या दिवशी बाजार बंद असला तरी, एक तासासाठी मुहूर्त ट्रेडिंग आयोजित करण्यात येते. या दिवशी फक्त एका तासासाठी सुरु असते. या एका तासात गुंतवणूकदार आपली छोटी गुंतवणूक करून बाजाराची परंपरा अबाधित ठेवतात. त्यामुळे तुम्ही पैसे कमावण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या दिवशी पैसे गुंतवू शकता कारण हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.

कोणत्या कंपनीचे शेअर घेणे फायद्याचे ठरू शकते? 

मुहूर्ताच्या व्यापारामुळे वर्षभर समृद्धी आणि लक्ष्मी आपल्या दारी नांदते, अशी मान्यता आहे. बाजारातील गुंतवणूकदारांना या शुभ सत्रात काही शेअर्स खरेदी करायला आवडतात. शेअर मार्केटमध्ये छोट्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळवता येऊ शकतो, असे जाणकार सांगतात. अशा १२ शेअर्सची यादी देण्यात येत आहे, जे पुढील दिवाळीपर्यंत गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात, असा कयास आहे. 

लार्ज-कॅप स्टॉकमधून ब्रोकरेजमध्ये ब्रिटानिया इंडस्ट्रीज (लक्ष्य किंमत: रु. ४,६००), सिप्ला (लक्ष्य किंमत: रु १,२६८), हीरो मोटोकॉर्प (लक्ष्य किंमत रु. ३,१६१), आयसीआयसीआय बँक (लक्ष्य किंमत- रु १,०७९) आणि अल्ट्राटेक सिमेंट (लक्ष्य किंमत- रु ८,५८१), अजंता फार्मा (लक्ष्य किंमत - रु १,४९१), बाटा इंडिया (लक्ष्य किंमत - रु २,२४०), सीसीएल उत्पादने (लक्ष्य किंमत - रु ७००), फेडरल बँक (लक्ष्य किंमत - रु १४९), जेके लक्ष्मी सिमेंट्स (लक्ष्य किंमत - रु ७८६), आयनॉक्स लीजर (लक्ष्य किंमत रु. ७२०) आणि ला ओपाला आरजी (लक्ष्य किंमत रु. ५००) सारख्या कंपन्यांचे शेअर्समधील गुंतवणूक सकारात्मक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: share stock market muhurat trading 2022 know about date and timing and investment list of stock to buy on diwali trading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.