Join us

Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 10:48 AM

Niva Bupa Health Insurance IPO Listing: हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रातील कंपनी निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सच्या शेअर्सनं आज देशांतर्गत बाजारात सुमारे ६ टक्क्यांच्या प्रीमियमवर एन्ट्री घेतली.

Niva Bupa Health Insurance IPO Listing: हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रातील कंपनी निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सच्या शेअर्सनं आज देशांतर्गत बाजारात सुमारे ६ टक्क्यांच्या प्रीमियमवर एन्ट्री घेतली. यानंतर त्यात आणखी वाढ दिसून आली. मात्र, कंपनीच्या आयपीओला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. इतकंच काय तर प्रत्येक प्रवर्गासाठी असलेला राखीव हिस्सा पूर्णपणे भरला गेला नाही. आयपीओ अंतर्गत ७४ रुपयांच्या दरानं शेअर्स जारी करण्यात आले होते. 

आज हे शेअर्स बीएसईवर ७८.५० रुपये आणि एनएसईवर ७८.१४ रुपयांवर पोहोचले. म्हणजेच आयपीओ गुंतवणूकदारांना सुमारे ६ टक्के लिस्टिंग गेन (Niva Bupa Listing Gain) मिळाला. लिस्टिंगनंतर शेअरमध्ये आणखी वाढ झाली. कंपनीचे शेअर बीएसईवर ८०.९४ रुपयांच्या (niva bupa share price) अपर सर्किटवर पोहोचले. म्हणजेच आयपीओ गुंतवणूकदारांना ९.३८ टक्के नफा झाला. मात्र नंतर त्यात पुन्हा घसरण झाली.

Niva Bupa IPO ला संमिश्र प्रतिसाद

निवा बुपाचा २,२०० कोटी रुपयांचा आयपीओ ७ ते ११ नोव्हेंबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला. या आयपीओला गुंतवणूकदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि प्रत्येक प्रवर्गासाठी राखीव भाग पूर्णपणे भरला गेला नाही. एकंदरीत हा इश्यू १.९० पट सब्सक्राइब झाला. यामध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठीचा (QIB) राखीव भाग २.१७ पट, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा (NII) ०.७१ पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठीचा हिस्सा २.८८ पट सबस्क्राईब झाला. 

या आयपीओ अंतर्गत ८००० कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करण्यात आले आहेत. याशिवाय ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या १८९,१८९,१८९ शेअर्सची विक्री करण्यात आली. ऑफर फॉर सेलचे पैसे शेअर्स विकणाऱ्या भागधारकांना दिले जातील. नवीन शेअर्सच्या माध्यमातून जमा होणारा पैसा कंपनी सॉल्व्हन्सी लेव्हल मजबूत करण्यासाठी कॅपिटल बेस वाढवणं आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल.

Niva Bupa Health Insurance बाबत

२००८ मध्ये स्थापन झालेली निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स ही बुपा ग्रुप आणि फॅटल टोन एलएलपी यांचा संयुक्त उपक्रम आहे. ही कंपनी इंडिव्हिज्युअल्ससह ग्रुप प्रोडक्टच्या माध्यमातून हेल्थ इन्शुरन्स देते. देशातील २२ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्याचा व्यवसाय पसरलेला आहे. कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाले तर ती सातत्यानं मजबूत करण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीला १९६.५३ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता परंतु पुढील आर्थिक वर्ष २०२३ मध्ये परिस्थिती सुधारली आणि कंपनीला १२.५४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला, जो पुढील आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ८१.८५ कोटी रुपयांवर पोहोचला. या कालावधीत कंपनीचा महसूल वार्षिक ४७ टक्क्यांहून अधिक चक्रवाढ वाढीच्या दराने (CAGR) वाढून ४,११८.६३ कोटी रुपयांवर पोहोचला. चालू आर्थिक वर्ष 2024-25 बद्दल बोलायचे झालं तर एप्रिल-जून २०२४ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीला १८.८२ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा आणि १,१२४.९० कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक