Lokmat Money >शेअर बाजार > 'या' सरकारी कंपनीच्या बंद होण्याच्या वृत्तामुळे गुंतवणूकदारांत भीती, ₹७०.६० वर आला शेअर

'या' सरकारी कंपनीच्या बंद होण्याच्या वृत्तामुळे गुंतवणूकदारांत भीती, ₹७०.६० वर आला शेअर

पाहा काय म्हणणं आहे सरकारचं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 02:57 PM2023-10-19T14:57:59+5:302023-10-19T14:58:11+5:30

पाहा काय म्हणणं आहे सरकारचं?

Shares hit rs 70 60 as investors fear news of MMTC Crash state owned company s closure details share market | 'या' सरकारी कंपनीच्या बंद होण्याच्या वृत्तामुळे गुंतवणूकदारांत भीती, ₹७०.६० वर आला शेअर

'या' सरकारी कंपनीच्या बंद होण्याच्या वृत्तामुळे गुंतवणूकदारांत भीती, ₹७०.६० वर आला शेअर

MMTC Crash: गुंतवणूकदार सध्या एमएमटीसी या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात विकत आहे. या कंपनीमध्ये सरकारचा सुमारे 90% हिस्सा आहे. दोन दिवसांत हा शेअर 10-10 टक्क्यांच्या लोअर सर्किटनं 87 रुपयांवरून 70.60 रुपयांपर्यंत खाली आला. गुंतवणूकदारांमध्ये असलेल्या या भीतीच्या वातावरणामागचं कारण म्हणजे मोदी सरकार एमएमटीसी बंद करणार असल्याची बातमी आहे.

CNBC-TV18 च्या वृत्तानुसार, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल 23 ऑक्टोबर रोजी MMTC, STC आणि PEC या तीन सरकारी कंपन्या बंद करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. एमएमटीसी आणि एसटीसीमध्ये सरकारचा सुमारे 90 टक्के हिस्सा आहे.

या बातमीपूर्वी 17 ऑक्टोबर रोजी एमएमटीसीने 89.04 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला होता. बीएसईच्या आकडेवारीनुसार, हा स्टॉक 12 ऑक्टोबरपासून जवळपास दररोज नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. 12 ऑक्टोबर रोजी, एमएमटीसीचे शेअर्स 70.72 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नव्या उच्चांकी स्तरावर पोहोचले होते. या दिवशी अप्पर सर्किट लागलं होतं. 13 ऑक्टोबरला हा विक्रमही मोडला आणि शेअर 79.90 रुपयांवर पोहोचला.

आता लोअर सर्किट
यानंतर, 16 ऑक्टोबर रोजी, आणखी एक नवीन उच्चांक नोंदवला गेला, शेअरनं 84.89 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. एका दिवसानंतर, 17 ऑक्टोबर रोजी, एमएमटीसीने पुन्हा इतिहास रचला आणि 89.04 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. दरम्यान एक बातमी आली आणि 18 ऑक्टोबर रोजी शेअर 78.38 रुपयांचं लोअर सर्किट लागलं. आज पुन्हा एकदा लोअर सर्किट लागलं असून शेअर 70.55 रुपयांवर आला.

का बंद होणार कंपनी
सार्वजनिक क्षेत्रातील या घटकांचा मूळ उद्देशच कालबाह्य झालाय. अशा व्यवसायांमध्ये अडकून राहणं ही सरकारची भूमिका नाही, असे त्यांचे म्हणणं आहे. सरकारनं यापूर्वी वाणिज्य विभागातील या कॅनालायझिंग एजन्सींच्या गरजेचं मूल्यांकन केले होते आणि त्यात ते अनावश्यक असल्याचं जाणवलं. पीईसी, एसटीसी आणि एमएमटीसी विविध प्रकारच्या आयात आणि निर्यातीवर देखरेख ठेवतात.

(टीप - यात सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Shares hit rs 70 60 as investors fear news of MMTC Crash state owned company s closure details share market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.