Lokmat Money >शेअर बाजार > Anil Ambaniच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी; रिलायन्स पॉवर, इन्फ्रामध्ये जोरदार वाढ; जाणून घ्या?

Anil Ambaniच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी; रिलायन्स पॉवर, इन्फ्रामध्ये जोरदार वाढ; जाणून घ्या?

Anil Ambani Shares : देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी तेजी पाहायला मिळत आहे. बाजारातील या तेजीमध्ये अनिल अंबानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स रॉकेट बनले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 11:40 AM2024-06-03T11:40:42+5:302024-06-03T11:41:06+5:30

Anil Ambani Shares : देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी तेजी पाहायला मिळत आहे. बाजारातील या तेजीमध्ये अनिल अंबानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स रॉकेट बनले आहेत.

Shares of Anil Ambani s companies surge Strong growth in Reliance Power Infra Know details | Anil Ambaniच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी; रिलायन्स पॉवर, इन्फ्रामध्ये जोरदार वाढ; जाणून घ्या?

Anil Ambaniच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी; रिलायन्स पॉवर, इन्फ्रामध्ये जोरदार वाढ; जाणून घ्या?

Anil Ambani Shares : देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी तेजी पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजाराचा (Share Market) निर्देशांक सेन्सेक्स २००० अंकांपेक्षा अधिक वधारला होता. बाजारातील या तेजीमध्ये अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या कंपन्यांचे शेअर्स रॉकेट बनले आहेत. अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवर (Reliance Power) आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या (Reliance Infra) शेअर्समध्ये जबरदस्त वाढ दिसून येत आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर सोमवारी अपर सर्किटवर पोहोचला आहे. तर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्येही ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
 

रिलायन्स पॉवरमध्ये अपर सर्किट
 

अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये सोमवारी अपर सर्किट लागलं. रिलायन्स पॉवरचा शेअर ५ टक्क्यांच्या वरच्या स्तरावर पोहोचला असून तो २५.७६ रुपयांवर गेला. गेल्या वर्षभरात रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये ९७ टक्क्यांची वाढ झाली. रिलायन्स पॉवरचा शेअर ५ जून २०२३ रोजी १३.१० रुपयांवर होता. ३ जून २०२४ रोजी कंपनीचा शेअर २५.७६ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ४ वर्षात रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये ९६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ५ जून २०२० रोजी कंपनीचा शेअर २.४३ रुपयांवर होता. रिलायन्स पॉवरचा शेअर ३ जून २०२४ रोजी २५.७६ रुपयांवर पोहोचला आहे.
 

रिलायन्स इन्फ्राच्या शेअर्समध्ये वाढ
 

सोमवारी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. रिलायन्स इन्फ्राचा शेअर सोमवारी १७९.०५ रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षभरात रिलायन्स इन्फ्राच्या शेअरमध्ये जवळपास ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या ४ वर्षात रिलायन्स इन्फ्राच्या शेअरमध्ये ७२५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. रिलायन्स इन्फ्राचा शेअर ५ जून २०२० रोजी २१.०५ रुपयांवर होता. सोमवार, ३ जून २०२४ रोजी कंपनीचा शेअर १७९.०५ रुपयांवर पोहोचला. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअरची ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळी ३०८ रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १३१.४० रुपये आहे.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Shares of Anil Ambani s companies surge Strong growth in Reliance Power Infra Know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.