Lokmat Money >शेअर बाजार > ₹३०० पर्यंत जाऊ शकतात 'या' महारत्न कंपनीचे शेअर्स; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी..."

₹३०० पर्यंत जाऊ शकतात 'या' महारत्न कंपनीचे शेअर्स; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी..."

गेल्या काही दिवसांपासून या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. आता यावर ब्रोकरेजही बुलिश दिसून येत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 12:58 PM2024-03-11T12:58:34+5:302024-03-11T12:59:07+5:30

गेल्या काही दिवसांपासून या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. आता यावर ब्रोकरेजही बुलिश दिसून येत आहेत.

Shares of BHEL Maharatna company can go up to rs 300 Experts are bullish suggested to buy | ₹३०० पर्यंत जाऊ शकतात 'या' महारत्न कंपनीचे शेअर्स; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी..."

₹३०० पर्यंत जाऊ शकतात 'या' महारत्न कंपनीचे शेअर्स; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी..."

दिग्गज कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या (BHEL) शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंग सरकारी कंपनी भेलच्या शेअर्सवर बुलिश दिसून येत आहे. BHEL चे मजबूत ऑर्डर बुक लक्षात घेऊन ब्रोकरेज हाऊसनं कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. अँटिक स्टॉक ब्रोकिंगनं BHEL च्या शेअर्सची टार्गेट प्राईज 299 रुपयांपर्यंत वाढवली आहे. सोमवार, 11 मार्च 2024 रोजी मुंबई स्टॉक एक्स्चेंजवर BHEL चे शेअर्स 259.05 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
 

9 महिन्यांत 36000 कोटींच्या ऑर्डर
 

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडनं (BHEL) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत 36000 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्याचं म्हटलं आहे. वार्षिक आधारावर ऑर्डर इनफ्लोमध्ये 102 टक्क्यांची वाढ झाली आहे. BHELला चौथ्या तिमाहीत आधीच 3 मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. कंपनीला 3X800 MW NLC तालाबिरा थर्मल पॉवर प्लांट, यमुनानगरमधील DCRTPP येथे 1X800 MW अल्ट्रा सुपर क्रिटिकल एक्स्पेन्शन युनिट आणि 2X800 MW NTPC सिंगरौली सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट स्टेज-3 साठी ऑर्डर मिळाल्या आहेत. या ऑर्डर्सची किंमत 30000 कोटी रुपये आहे.
 

वर्षभराच 247%टक्क्यांची वाढ
 

वर्षभरात BHEL या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात BHEL चे शेअर्स 247% वाढले आहेत. 13 मार्च 2023 रोजी भेलचे शेअर्स 74.23 रुपयांवर होते. 11 मार्च 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 259.05 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 85 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 139.85 रुपयांवरून 259.05 रुपयांपर्यंत वाढले आहेत. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या (BHEL) शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 271.90 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 67.63 रुपये आहे. 
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Shares of BHEL Maharatna company can go up to rs 300 Experts are bullish suggested to buy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.