Lokmat Money >शेअर बाजार > रेल्वे कंपन्यांचे शेअर्स जोरदार आपटले, गुंतवणूकदार टेन्शनमध्ये; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...

रेल्वे कंपन्यांचे शेअर्स जोरदार आपटले, गुंतवणूकदार टेन्शनमध्ये; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...

काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या स्टॉकनं गुंतवणूकदारांना मोठी कमाई करून दिली होती. परंतु आता त्याच स्टॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून येतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 03:05 PM2024-03-15T15:05:35+5:302024-03-15T15:06:11+5:30

काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या स्टॉकनं गुंतवणूकदारांना मोठी कमाई करून दिली होती. परंतु आता त्याच स्टॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून येतोय.

Shares of railway companies hit hard investors in tension expert suggestion rvnl itctc railtel irfc | रेल्वे कंपन्यांचे शेअर्स जोरदार आपटले, गुंतवणूकदार टेन्शनमध्ये; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...

रेल्वे कंपन्यांचे शेअर्स जोरदार आपटले, गुंतवणूकदार टेन्शनमध्ये; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...

Railway stocks: काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या स्टॉकनं गुंतवणूकदारांना मोठी कमाई करून दिली होती. परंतु आता त्याच स्टॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून येतोय. काही दिवसांपासून आयआरएफसी लिमिटेड (IRFC Limited), आरव्हिएनएल (RVNL) आणि इरकॉन (IRCON) इंटरनॅशनल लिमिटेडसारखे स्टॉक्स घसरताना दिसत आहेत. हे तेच स्टॉक्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना ३०० टक्क्यांपर्यंतचा रिटर्न दिलाय.
 

IRFC लिमिटेड
 

जरी गुरुवारी, IRFC लिमिटेडच्या शेअर सुमारे 12 टक्क्यांची वाढ झाली असली, तरी शुक्रवारी तो सुमारे 1.50% घसरून 133.45 रुपयांवर आला. या वर्षाच्या सुरुवातीच्या ₹192 च्या उच्चांकावरून स्टॉक 35 टक्क्यांनी घसरला आहे. IRFC सारख्या शेअर्समध्ये मार्केटमध्ये फारच कमी फ्री फ्लोट आहे. सरकारकडे अजूनही IRFC मध्ये 86 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा आहे.
 

RVNL 
 

गुरुवारी, रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्समध्ये सुमारे 9 टक्के वाढ दिसून आली. स्टॉक वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीला मिळालेली ऑर्डर. मात्र, शुक्रवारी हा शेअर सुमारे 3 टक्क्यांनी घसरला. RailTel चे शेअर्सही घसरताना दिसत आहेत. इतर रेल्वे कंपन्यांचे शेअर्स देखील 5% ते 10% नी घसरले आहेत किंवा काही दबावाखाली आहेत. आयआरएफसीचा शेअर आतापर्यंत ३५%, रेलटेल ३८%, इरकॉन ३३%, आरव्हीएनएल ३६%, आयआरसीटीसी १७ टक्क्यांनी घसरला आहे.
 

काय म्हणतायत एक्सपर्ट्स?
 

कोटक महिंद्रा AMC चे नीलेश शाह यांनी CNBC-TV18 ला सांगितले की कमी फ्री फ्लोट असलेल्या स्टॉक्समधील शेअरमध्ये करेक्शन काही काळ चालू राहतील अशी अपेक्षा आहे. रेल्वेशी संबंधित कंपन्यांची स्थितीही तशीच आहे. जर कोणी या कंपन्यांची निवड केली, तर गुंतवणूकदार चुकीचे ठरणार नाहीत. 
 

त्याच वेळी, इंडिट्रेड कॅपिटलचे सुदीप बंदोपाध्याय म्हणाले, रेल्वे क्षेत्रातील मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या किंवा फायनान्स कंपन्यांमधील काही करेक्शननंतर त्यादीर्घकालीन गुंतवणूकीच्या दृष्टीनं चांगल्या ठरू शकतील.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Shares of railway companies hit hard investors in tension expert suggestion rvnl itctc railtel irfc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.