Lokmat Money >शेअर बाजार > Zomato Block Deal : Zomato च्या शेअर्समध्ये घसरण, ब्लॉक डीलच्या चर्चांदरम्यान स्टॉक्स गडगडले

Zomato Block Deal : Zomato च्या शेअर्समध्ये घसरण, ब्लॉक डीलच्या चर्चांदरम्यान स्टॉक्स गडगडले

Zomato Block Deal : फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे शेअर्सकडे आज फोकसमध्ये आहेत. ब्लॉक डीलसाठी फ्लोअर प्राइस २५१.६८ रुपये निश्चित करण्यात आलीये.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 10:52 AM2024-08-20T10:52:53+5:302024-08-20T10:53:07+5:30

Zomato Block Deal : फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे शेअर्सकडे आज फोकसमध्ये आहेत. ब्लॉक डीलसाठी फ्लोअर प्राइस २५१.६८ रुपये निश्चित करण्यात आलीये.

Shares of Zomato fall stocks tumble amid talks of block deal know details base price | Zomato Block Deal : Zomato च्या शेअर्समध्ये घसरण, ब्लॉक डीलच्या चर्चांदरम्यान स्टॉक्स गडगडले

Zomato Block Deal : Zomato च्या शेअर्समध्ये घसरण, ब्लॉक डीलच्या चर्चांदरम्यान स्टॉक्स गडगडले

Zomato Block Deal : फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे शेअर्सकडे आज फोकसमध्ये आहेत. अँटफिन सिंगापूर होल्डिंग्स मंगळवारी आपला १.५४ टक्के हिस्सा विकणार असल्याची माहिती समोर आली आहे. ब्लॉक डीलसाठी फ्लोअर प्राइस २५१.६८ रुपये निश्चित करण्यात आलीये. रिपोर्टनुसार एकूण ३४२० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री होणार आहे. या किमतीत ब्लॉक डील केल्यास सोमवारच्या बंदच्या तुलनेत ते ४.३९ टक्क्यांनी कमी आहे. एनएसईमध्ये ते २६३.२४ रुपये आहे.

Antfin Singapore Holdings नं मार्चमध्ये विकलेले शेअर्स

जूनअखेर या कंपनीत अँटफिन सिंगापूर होल्डिंगचा ४.३० टक्के हिस्सा आहे. त्यांच्याकडे ३७,२८,५५,२२५ कोटी शेअर्स होते. अँटफिन सिंगापूर होल्डिंगनं यावर्षी मार्चमध्ये २.१ टक्के हिस्सा विकला होता. त्यानंतर १६० रुपये प्रति शेअर दरानं विक्री करण्यात आली. डिसेंबर २०२३ पर्यंत झोमॅटोमधील एकूण हिस्सा ६.४२ टक्के होता. याआधी नोव्हेंबर २०२३ मध्ये चीनची कंपनी अलीपेनं आपला संपूर्ण ३.४४ टक्के हिस्सा विकला होता.\

टार्गेट प्राइस ३२० रुपये

सोमवारी झोमॅटोचा शेअर २८० रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला. बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, ब्रोकरेज फर्म यूबीएसनं झोमॅटोच्या शेअर्सना 'बाय' टॅग दिला आहे. ब्रोकरेज हाऊसनं कंपनीची टार्गेट प्राइस २६० रुपयांवरून ३२० रुपये प्रति शेअर केली आहे. मॉर्गन स्टॅनलीने मात्र झोमॅटोला 'ओव्हरवेट' म्हटलंय. ब्रोकरेज हाऊसने २७८ रुपयांचे टार्गेट प्राइस निश्चित केलं आहे.

गेलं एक वर्ष उत्तम

झोमॅटोच्या शेअरच्या किंमतीत गेल्या वर्षभरात १९३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ६६ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, वर्षभरासाठी हा शेअर होल्ड करणाऱ्यांना १९ टक्क्यांचा लाभ झालाय.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Shares of Zomato fall stocks tumble amid talks of block deal know details base price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.