आपण 1 फेब्रुवारीला सादर झालेल्या अंतरिम बजेटपूर्वी सरकारी कंपनी रेल्वे विकास निगम लिमिटेडचे (RVNL) शेअर खरेदी केले असते, तर आतापर्यंत आपली गुंतवणूक दुप्पट झाली असती. या काळात रेल्वेशी संबंधित शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे.
यांत, आरव्हीएनएलचा शेअर सर्वाधिक म्हणजेच 101 टक्क्यांनी वधारला आहे. याच पद्धतीने जुपिटर वॅगन्सच्या शेअरमध्ये 64%, टीटागड रेल्वे सिस्टिम्समध्ये 56% आणि ओरिएंटल रेल्वेमध्ये 53% ची तेजी आली आहे. या कालावधीत रेल्वेशी संबंधित टॉप 12 शेअर्सचा कंबाइंड मार्केट कॅप जवळपास 1.6 लाख कोटी रुपयांनी वाढला आहे. गेल्या तीन वर्षांचा विचार करता, या काळात टीटागड रेल्वे सिस्टिम्सने 2,210% टक्क्यांचा बंपर परतावा दिला आहे.
अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वेसाठीच्या तरतुदीत वाढ केली होती. ती 5% ने वाढून 2.6 लाख कोटी रुपये झाली होती. आता 23 जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातही रेल्वेच्या तरतुदीत आणखी वाढ होऊ शकते, असे अनेक विश्लेषकांचे म्हणणे आहे. प्रभुदास लीलाधरचे अमनीश अग्रवाल यांनी म्हटले आहे की, रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॅपॅसिटी अपग्रेड करणे, नव्या ट्रेन (वंदे भारत, वंदे मेट्रो, नमो भारत आदि) सुरू करण्यासंदर्भात आणि सुरक्षेत (कवच अँटी-ट्रेन टक्कर प्रणाली) सुधार करण्यासाठी खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
केव्हापर्यंत असेल तेजी? -
अग्रवाल म्हटले, रेल्वेच्या मोठ्या कॅपेक्स योजनेचा फायदा IRCON, RVNL, Siemens, Timken India, HBL Power, ABB, BEML, BHEL, ज्युपिटर आणि Titagarh Wagons सारख्या कंपन्यांना होईल. इरकॉन, आरव्हीएनएल, सिमेंस, टिमकेन इंडिया, एचबीएल पॉवर, एबीबी, बीईएमएल, बीएचआयएल, जुपिटर आणि टीटागड वॅगन सारख्या कंपन्यांना लाभ होईल. या कंपन्यांना अनेक ऑर्डर मिळू शकतात. यामुळे या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी येऊ शकते. ओमनीसायन्स कॅपिटलचे सीईओ आणि मुख्य गुंतवणूकदार रणनीतीकार डॉ. विकास गुप्ता म्हणाले. जलद अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केल्याने महसूल आणि नफ्यात वाढ होऊ शकते. असे झाल्यास, रेल्वेशी संबंधित शेअर्सचे सध्याचे व्हॅल्यूएशन योग्य ठरेल. याशिवाय, रेल्वेचा स्टॉक पुढील 5-7 वर्षांपर्यंत चांगला परतावा देऊ शकतो.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)