Lokmat Money >शेअर बाजार > Shares to Buy : एचयूएल, अशोक लेलँडसह 'या' शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, पाहा काय आहे टार्गेट प्राईस; दिलं 'बाय' रेटिंग

Shares to Buy : एचयूएल, अशोक लेलँडसह 'या' शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, पाहा काय आहे टार्गेट प्राईस; दिलं 'बाय' रेटिंग

तुम्हालाही शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करायची असेल तर तुम्ही त्या शेअर्सवर शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे ज्यांचं कामकाज आणि नफा येत्या काळात चांगला वाढण्याची अपेक्षा आहे. पाहा या आठवड्यात ब्रोकरेज कोणत्या शेअर्सवर बुलिश आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 01:35 PM2024-05-27T13:35:09+5:302024-05-27T13:36:25+5:30

तुम्हालाही शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करायची असेल तर तुम्ही त्या शेअर्सवर शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे ज्यांचं कामकाज आणि नफा येत्या काळात चांगला वाढण्याची अपेक्षा आहे. पाहा या आठवड्यात ब्रोकरेज कोणत्या शेअर्सवर बुलिश आहेत.

Shares to Buy Brokerages bullish on hul ashok leyland MTARTECH shares including see what s the target price Given Buy rating | Shares to Buy : एचयूएल, अशोक लेलँडसह 'या' शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, पाहा काय आहे टार्गेट प्राईस; दिलं 'बाय' रेटिंग

Shares to Buy : एचयूएल, अशोक लेलँडसह 'या' शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, पाहा काय आहे टार्गेट प्राईस; दिलं 'बाय' रेटिंग

तुम्हालाही शेअर बाजारातगुंतवणूक करून कमाई करायची असेल तर तुम्ही त्या शेअर्सवर शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे ज्यांचं कामकाज आणि नफा येत्या काळात चांगला वाढण्याची अपेक्षा आहे. शेअर बाजारासाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे. शेअर बाजार आजवरच्या उच्चांकी पातळीवर असून गेल्या काही ट्रेडिंग सत्रांपासून त्यात वाढ दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, अशी आशा शेअर बाजाराला वाटत असली तरी शेअर बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशातच एक्सपर्ट काही शेअर्सवर बुलिश दिसून येत आहेत.
 

एमटीएआर, एचयूएल आणि अशोक लेलँडवर ब्रोकरेज बुलिश दिसत आहे. मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेसनं या शेअर्सना बाय रेटिंग दिलं असून त्यांचं टार्गेट प्राईजही वाढवलं आहे. एमटीएआरचा शेअर सोमवारी २१२५ रुपयांवर ट्रेड करत होता. या शेअरला मोतीलाल ओस्वालनं २८०० रुपयांचं टार्गेट प्राईजसह बाय रेटिंग दिलंय. तर दुसरीकडे एचयूएलचा शेअर २३९४ रुपयांवर व्यवहार करत होता. या शेअरला २९०० रुपयांचं तर अशोक लेलँडचा शेअर २२१ रुपयांवर ट्रेड करत असून ब्रोकरेजनं याला २४० रुपयांची टार्गेट प्राईज दिली आहे.
 

एमएटीआर - MTARTECH, मोठ्या जागतिक मल्टीनॅशनल कंपनी, सरकारी विभाग आणि मोठ्या भारतीय सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील उद्योगांना अचूक अभियांत्रिकी प्रणालीचा प्रमुख पुरवठादार असल्यामुळे, गेल्या काही वर्षांत उद्योगात स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. BE ला (ग्लोबल लीडर) इंधन सेल घटकांचा सर्वात मोठा पुरवठादार म्हणून, कंपनीला येत्या काही वर्षांत इंधन सेलच्या वाढत्या मागणीचा फायदा होईल, असं ब्रोकरेजनं म्हटलं आहे.
 

एचयूएल - HUVR ची व्हॉल्यूम ग्रोथ कमी झाली आहे आणि आर्थिक वर्ष २०२५ मध्ये हळूहळू व्हॉल्यूम रिकव्हरी अपेक्षित आहे. HUVR ची विस्तृत उत्पादनं आणि प्राईज सेगमेंटमध्ये उपस्थिती यामुळे कंपनीच्या स्थिर वाढीसाठी मिळेल. एफएमजीसी उत्पादनांची मागणी हळूहळू वाढण्याची अपेक्षा आहे. सामान्यपेक्षा अधिक मान्सूनचा अंदाज आणि मॅक्रो इकॉनॉमिक निर्देशकांमधील सकारात्मक ट्रेंड उद्योगासाठी चांगले असल्याचं ब्रोकरेजचं म्हणणं आहे.
 

अशोक लेलँड - अशोक लेलँडच्या आर्थिक वर्ष २०२४ च्या तिमाहीचे निकाल उत्कृष्ट होते. तसंच त्यांच्या EBITDA मार्जिनमध्येही वाढ झाली. व्हॉल्यूम वाढ मध्यम राहण्याची अपेक्षा असताना, फायदेशीर वाढीवर लक्ष केंद्रित केल्यानं एकूण मार्जिनला मदत मिळण्याची अपेक्षा ब्रोकरेजनं व्यक्त केली.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तीक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Shares to Buy Brokerages bullish on hul ashok leyland MTARTECH shares including see what s the target price Given Buy rating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.