Join us  

Shares to Buy : शेअर बाजाराच्या चढ-उतारादरम्यान ब्रोकरेज SBI सह 'या' शेअर्सवर बुलिश, दिलं 'बाय' रेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 1:17 PM

बाजारातील मोठ्या चढ-उतारादरम्यान ब्रोकरेजनं काही शेअर्सना बाय रेटिंग दिलं आहे. पाहा कोणते आहेत हे शेअर्स आणि काय म्हटलंय ब्रोकरेजनं?

शेअर बाजाराची सुरुवात मंगळवारी घसरणीसह झाली. बीएसई सेन्सेक्स १९१ अंकांनी घसरून ७६,३९३ अंकांवर तर निफ्टी १३ अंकांनी घसरून २३,२४६ अंकांवर उघडला. मात्र यानंतर कामकाजादरम्यान शेअर बाजारात तेजी दिसून आली. सोमवारीही दिवसभरात कामाकाजादरम्यान शेअर बाजारात मोठे चढ-उतार दिसून आले. परंतु कामकाजाच्या अखेरिस बाजार घसरणीसह बंद झाला होता. अशा स्थितीतही एक्सपर्ट काही स्टॉक्सवर बुलिश असून त्यांना बाय रेटिंग दिलं आहे. 

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेस अपोलो हॉस्पीटल, एसबीआय आणि टाटा कन्झुमरवर बुशिल दिसून येत आहे. ब्रोकरेजनं या शेअर्सला मोठ्या टार्गेट प्राईजसह बाय रेटिंग दिलंय. मोतीलाल ओस्वालनं अपोलो हॉस्पीटलला ६७५० रुपयांच्या टार्गेट प्राईजसह बाय रेटिंग दिलंय. तर एसबीआयला ९२५ रुपयांच्या आणि टाटा कन्झुमरला १३५० रुपयांच्या टार्गेट प्राईजसह बाय रेटिंग दिलंय. 

अपोलो हॉस्पीटल : अपोलो हेल्थकोमधील तोटा कमी झाल्यानं वार्षिक आधारावर एबिटडाची वाढ कायम राहिली. एपीएचएस मध्यम कालावधीत हेल्थकोमध्ये विक्री वाढीचा वेग सुधारण्यासाठी आणि नफा वाढविण्यासाठी प्रयत्नांची अंमलबजावणी करत असल्याचं ब्रोकरेनं म्हटलंय.  

एसबीआय : एसबीआयनं आर्थिक वर्ष २०१८ मध्ये ६५ बिलियन रुपयांच्या तोट्यापासून ते आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ₹ ६११ बिलियनच्या नफ्यापर्यंत उत्पन्नात वेगानं सुधारणा केली आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीच्या पीएटीमध्ये २४ टक्के वाढ झाली आहे. कॉर्पोरेट सेगमेंटमध्ये चांगली सुधारणा झाल्यानं व्यवसायाची वाढ मजबूत राहिली. विविध क्षेत्रांतील व्यापक वाढीच्या जोरावर कर्जात वार्षिक १५.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जीएनपीए सुधारल्यानं आणि स्लिपेज कमी झाल्याने असेट क्वालिटी उत्तम राहिली. एसबीआय स्थिर उत्पन्न देण्यासाठी चांगल्या स्थितीत असल्याचा आमचा विश्वास आहे, असं ब्रोकरेजनं म्हटलंय. 

टाटा कन्झ्युमर : मुख्य व्यवसाय मजबूत करणं आणि वेगवान करणं, नव्या संधींचा शोध, समन्वय, पुरवठा साखळीचं डिजिटायझेशन, त्यांचे उत्पादन पोर्टफोलिओ आणि नाविन्यपूर्ण विस्तार करणे, प्रीमियमाझेशन, सस्टेनॅबिलिटी, विक्री आणि वितरणाच्या पायाभूत सुविधा, पुरवठा साखळी आणि मल्टीकॅटेगरी एफएमजीसी प्लेअर अशी उद्दिष्ट्य टाटा कन्झ्युमरनं समोर ठेवली. यापुढे त्यांच्या व्यवसायात सुधारणा अपेक्षित असल्याचं ब्रोकरेजनं म्हटलं. 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक