Lokmat Money >शेअर बाजार > Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?

Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?

शुक्रवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह बंद झालं होतं. परंतु आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. पण या स्थितीतही काही शेअर्सवर एक्सपर्ट्स बुलिश दिसून येत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 12:17 PM2024-05-13T12:17:12+5:302024-05-13T12:17:51+5:30

शुक्रवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह बंद झालं होतं. परंतु आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. पण या स्थितीतही काही शेअर्सवर एक्सपर्ट्स बुलिश दिसून येत आहेत.

Shares to Pick Expert Bullish on sbi dmar kei Shares Even in Declining Market Which are These Stocks | Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?

Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?

Shares to Pick : शुक्रवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह बंद झालं होतं. परंतु आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. कामकाजादरम्यान, शेअर बाजारात ४०० अंकांपेक्षा मोठी घसरण दिसून आली होती. दरम्यान, काही शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश आहेत. येणाऱ्या काळात त्यात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीये.
 

भारतीय बाजारांसाठी जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत आहेत. शुक्रवारी अमेरिकी बाजार तेजीसह बंद झाले असले तरी आशियाई बाजारात फारशी हालचाल दिसून आली नाही. कच्च्या तेलाच्या किमतीही घसरल्या आहेत. तीन आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्यानंतर सोन्याची झळाळीही पुन्हा एकदा कमी होताना दिसतेय. अमेरिकन डॉलर इंडेक्स १०५.३४ वर मजबूत आहे आणि अमेरिकेची १० वर्षाची बॉन्ड यील्ड ४.५ टक्क्यांच्या जवळ आहे. यूएस फ्युचर्समध्येही पूर्णपणे फ्लॅट ट्रेडिंग होत आहे.
 

या शेअर्सवर ठेवू शकता लक्ष
 

मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेसनं येत्या काळात एसबीआय (SBI), एव्हेन्यू सुपरमार्ट (Avenue Supermart) आणि केईआय इंडस्ट्रीजचे (KEI Industris) शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. नुकतेच कंपन्यांनी आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपन्यांचे उत्तम तिमाही निकाल पाहता मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेस या शेअर्सवर बुलिश दिसून येत असून याला बाय रेटिंग दिलं आहे.
 

मोतीलाल ओस्वालनं एसबीआयच्या शेअरसाठी ९२५ रुपयांचं टार्गेट प्राईज दिलं आहे. तर एव्हेन्यू सुपरमार्टच्या शेअरसाठी त्यांनी ५३१० रुपयांचं टार्गेट आणि केईआय इंडस्ट्रीजच्या शेअरला ५००० रुपयांच्या टार्गेट प्राईजसह त्यांनी बाय रेटिंग दिलं आहे.
 

एसबीआय शेअर - SBIN नं या तिमाहीत महसुलातील स्थिर वाढ नोंदवली. बँकेचा ऑपरेटिंग खर्च कमी राहिल. परिणामी पीपीओपीमध्ये चांगली वाढ झाली. कॉर्पोरेट विभागात व्यवसायाची वाढ मजबूत राहिली. व्यवस्थापनाला क्रेडिट ग्रोथ १३-१५ टक्क्यांच्या श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे जीएनपीए रेश्योमध्ये सुधारणा झाली असल्याचं मोतीलाल ओस्वालनं म्हटलं.
 

एव्हेन्यू सुपरमार्ट - चौथ्या तिमाहीमध्ये जनरल मर्चेंडाईज आणि अपियरल विभागातील योगदान वाढतच गेलं आहे. कंपनीची आता भारतातील २३ शहरांमध्ये उपस्थिती आहे. डीमार्टचा SSSG नीचांकी पातळीच्या जवळ होता.  तसंच सतत खर्चाची कार्यक्षमता महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. GM&A च्या उच्च मार्जिन श्रेणीतील रिकव्हरी हा पुढे मार्जिन सुधारण्यासाठी महत्त्वाचा भाग ठरणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
 

केईआय इंडस्ट्रीज - केईआय इंडस्ट्रीजचे चौथ्या तिमाहीचे निकाल उत्कृष्ट आहेत. नुकत्याच त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ईव्ही चार्जिंग केबल्सचा समावेश करण्यात आला. त्यानंतर त्यांचं EBITDA मार्जिन वार्षिक १०.५ टक्क्यांपर्यंत वाढलेय. यापुढेही आणखी उत्पादनांचा पोर्टफोलिओमध्ये समावेश करण्याची कंपनीची योजना आहे. FY25E मध्ये कंपनीला वार्षिक महसूलात १७ टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचं त्यांनी म्हटलंय.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Shares to Pick Expert Bullish on sbi dmar kei Shares Even in Declining Market Which are These Stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.