Lokmat Money >शेअर बाजार > IPO चं २०० रुपयांवर लिस्टिंग, एका मिनिटांत लागलं अपर सर्किट; ४६ टक्क्यांचा फायदा

IPO चं २०० रुपयांवर लिस्टिंग, एका मिनिटांत लागलं अपर सर्किट; ४६ टक्क्यांचा फायदा

कंपनीचे शेअर्स 200 रुपयांवर लिस्ट झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना एका शेअरवर 39 टक्के नफा मिळालाय.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 01:12 PM2024-01-19T13:12:57+5:302024-01-19T13:14:07+5:30

कंपनीचे शेअर्स 200 रुपयांवर लिस्ट झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना एका शेअरवर 39 टक्के नफा मिळालाय.

Shree Marutinandan Tubes IPO listing at Rs 200 upper circuit in one minute A gain of 46 percent | IPO चं २०० रुपयांवर लिस्टिंग, एका मिनिटांत लागलं अपर सर्किट; ४६ टक्क्यांचा फायदा

IPO चं २०० रुपयांवर लिस्टिंग, एका मिनिटांत लागलं अपर सर्किट; ४६ टक्क्यांचा फायदा

श्री मारुती नंदन ट्यूब्स आयपीओनं (Shree Marutinandan Tubes IPO listing) शेअर बाजारात जोरदार एन्ट्री घेतली आहे. कंपनीचे शेअर्स 200 रुपयांवर लिस्ट झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना एका शेअरवर 39 टक्के नफा मिळालाय. कंपनीच्या आयपीओची किंमत 143 रुपये प्रति शेअर होती. प्री-लिस्टिंग सत्रात या शेअरनं उत्तम कामगिरी केली होती. 

एका मिनिटांत अपर सर्किट

लिस्टींगच्या एका मिनिटातच कंपनीच्या शेअर्सना 5 टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. त्यानंतर शेअर्सची किंमत 210 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. म्हणजेच गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 46 टक्के नफा कमावला आहे. कंपनी बीएसई, एमएसईमध्ये (BSE SME) लिस्ट झाली आहे.

गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद 

श्री मारुतीनंदर ट्यूब्स आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शेवटच्या दिवशी आयपीओला 47.16 पट सबस्क्रिप्शन मिळालं. रिटेल श्रेणीत आयपीओ 59.71 पट सबस्क्राइब झाला. तर इतर श्रेणींमध्ये, हा आयपीओ 32.67 पट सबस्क्राइब झाला होता. आयपीओची साईज 14.20 कोटी रुपये होती.

72 पट झालेला सबस्काइब

हा एसएमई आयपीओ 12 जानेवारी ते 16 जानेवारी 2024 पर्यंत खुला होता. कंपनीनं IPO साठी 143 रुपये प्रति शेअर इतका प्राईज बँड निश्चित केला होता. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी लॉट साइज 1000 शेअर्स होता. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान 1,43,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागली. आयपीओ नंतर कंपनीतील प्रवर्तकांचा एकूण हिस्सा 82 टक्क्यांवरून 58.30 टक्क्यांवर आला.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Shree Marutinandan Tubes IPO listing at Rs 200 upper circuit in one minute A gain of 46 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.