Lokmat Money >शेअर बाजार > घसरत्या बाजारातही रॉकेट बनला हा छोटा शेअर, २ वेळा दिलेत बोनस शेअर्स; ५ दिवसांत ४३% ची तेजी

घसरत्या बाजारातही रॉकेट बनला हा छोटा शेअर, २ वेळा दिलेत बोनस शेअर्स; ५ दिवसांत ४३% ची तेजी

Shubham Polyspin Share Price : आज कंपनीच्या शेअरला २० टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. मंगळवारीही कंपनीचा शेअर २० टक्क्यांच्या अपर सर्किटसह २७.४६ रुपयांवर बंद झाला. ५ दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये ४३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 12:06 PM2024-09-04T12:06:53+5:302024-09-04T12:07:17+5:30

Shubham Polyspin Share Price : आज कंपनीच्या शेअरला २० टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. मंगळवारीही कंपनीचा शेअर २० टक्क्यांच्या अपर सर्किटसह २७.४६ रुपयांवर बंद झाला. ५ दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये ४३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

Shubham Polyspin Share became a rocket even in the falling market bonus shares given 2 times 43 percent gain in 5 days | घसरत्या बाजारातही रॉकेट बनला हा छोटा शेअर, २ वेळा दिलेत बोनस शेअर्स; ५ दिवसांत ४३% ची तेजी

घसरत्या बाजारातही रॉकेट बनला हा छोटा शेअर, २ वेळा दिलेत बोनस शेअर्स; ५ दिवसांत ४३% ची तेजी

Shubham Polyspin Share Price : शुभम पॉलीस्पिन या छोट्या कंपनीचे शेअर्स घसरत्या बाजारातही तेजीत आहेत. बुधवारी कंपनीचा शेअर २० टक्क्यांनी वधारून ३२.९५ रुपयांवर पोहोचला. शुभम पॉलीस्पिनच्या शेअरला सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट लागलं. मंगळवारी कंपनीचा शेअर २० टक्क्यांच्या अपर सर्किटसह २७.४६ रुपयांवर बंद झाला. ५ दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये ४३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. शुभम पॉलीस्पिनच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ४२.६६ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १६.५१ रुपये आहे.

३ महिन्यांत ७९ टक्के वाढ

शुभम पॉलीस्पिनच्या शेअरमध्ये गेल्या ३ महिन्यांत ७९ टक्क्यांची वाढ झाली आहे. ५ जून २०२४ रोजी कंपनीचा शेअर १८.४१ रुपयांवर होता. शुभम पॉलीस्पिनचा शेअर ४ सप्टेंबर २०२४ रोजी ३२.९५ रुपयांवर पोहोचला. गेल्या महिन्याभरात शुभम पॉलीस्पिनच्या शेअरमध्ये जवळपास ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर २२.०३ रुपयांवरून ३२.९५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ५ दिवसांत शुभम पॉलीस्पिनच्या शेअरमध्ये ४३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. २९ ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीचा शेअर २३.०१ रुपयांवर होता, जो ४ सप्टेंबर २०२४ रोजी ३२.९५ रुपयांवर पोहोचलाय.

२ वेळा बोनस शेअर्सचं वाटप

कंपनीनं २ वेळा बोनस शेअर्सचं वाटप केलं आहे. शुभम पॉलीस्पिनने गेल्या ४ वर्षात २ वेळा बोनस शेअर्सचं वाटप केलंय. कंपनीनं ऑक्टोबर २०२० मध्ये १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत. म्हणजेच कंपनीने प्रत्येक एका शेअरमागे एक बोनस शेअर दिला होता. शुभम पॉलीस्पिननं सप्टेंबर २०२२ रोजी १०:१ या प्रमाणात बोनस शेअर दिले. म्हणजेच कंपनीनं प्रत्येक १० शेअरमागे १ बोनस शेअर दिला. कंपनीत प्रवर्तकांचा ७२.७८ टक्के हिस्सा आहे. तर, पब्लिक शेअरहोल्डिंग २७.२२ टक्के आहे. शुभम पॉलीस्पिनचे मार्केट कॅप जवळपास ४० कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Shubham Polyspin Share became a rocket even in the falling market bonus shares given 2 times 43 percent gain in 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.