SIP Investment: तुम्ही लॉन्ग टर्म इनव्हेस्टमेंटद्वारे कोट्यधीश बनण्याचे स्वप्न पाहत असाल, तर SIP (Systematic Investment Plan) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. SIP चा "7-5-3-1" नियम योग्यप्रकारे गुंतवणूक करण्यास मदत करतो. योग्य प्लॅनिंग आणिनियमित गुंतवणुकीतून 1-2 सोडा, पण 10 कोटी रुपयांचा फंड उभारला जाऊ शकतो.
काय आहे SIP चा नियम 7-5-3-1 ?
ही एक अशी स्ट्रॅटेजी आहे, जी तुम्हाला 1-2 नाही, तर 10 कोटी रुपयांचा फंड उभारण्यास मदत करतो.
Rule 7: पहिला नियम पाहा
दीर्घकाळ SIP मध्ये राहणे सर्वात महत्वाचे आहे. किमान 7 वर्षे मार्केटमध्ये आपली गुंतवणूक टिकून ठेवा. बाजार कोसळला तरी घाबरू नका.
Rule 5: फंड निवडण्याचे 5 पॉइंट्स
Good Quality Fund: NFO पासून सावध राहा.
Growth Track Record: मागील कामगिरी पाहा.
Expense Ratio < 1%: स्वस्त फंड निवडा.
Holdings चेक करा: पोर्टफोलिओवर लक्ष ठेवा.
Equity Allocation: इक्विटीमध्ये किती गुंतवणूक करावी, हे समजून घ्या.
Rule 3: तीन परिस्थितींवर लक्ष ठेवा
Negative Return Phase: SIP दरम्यान 7-15% पर्यंत निगेटिव्ह रिटर्न सामान्य आहे.
Irritation Phase: 1-2 वर्षांचा फ्लॅट ग्रोथ होऊ शकतो.
Panic Phase: 2008 सारख्या परिस्थितीला घाबरू नका. बाजारात टिकून राहा.
Rule 1: SIP step-up
प्रत्येकवर्षी आपल्या SIP मध्ये 10% वाढ करा. याला Step-Up SIP म्हटले जाते. यामुळे तुमची गुंतवणूक वेगाने वाढते. या नियमांचे पालन करुन तुम्ही आपले इच्छित लक्ष गाठू शकता.
(टीप: कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)