Join us

२ वर्षांमध्ये २०६५% चा फायदा; कंपनी देणार एका शेअरवर ९ मोफत शेअर्स देणार, रेकॉर्ड डेट सोमवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 12:23 IST

Sky Gold Limited Bonus Share: कंपनी एका शेअरवर ९ शेअर बोनस देत आहे. याची रेकॉर्ड डेट पुढील आठवड्यात आहे. कंपनी दुसऱ्यांदा बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत आहे.

Sky Gold Limited Bonus Share : स्काय गोल्ड लिमिटेड या कंपनीनं बोनस शेअरची घोषणा केली आहे. कंपनी एका शेअरवर ९ शेअर बोनस देत आहे. याची रेकॉर्ड डेट पुढील आठवड्यात आहे. कंपनी दुसऱ्यांदा बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर २.८१ टक्क्यांनी वधारून ४४३५.३० रुपयांवर बंद झाला.

सोमवारी रेकॉर्ड डेट

कंपनीनं शेअर बाजारांना दिलेल्या माहितीनुसार ते एका शेअरवर ९ शेअर्सचा बोनस देणार आहेत. कंपनीनं या बोनस इश्यूसाठी १६ डिसेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच सोमवारी कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस स्टॉक म्हणून व्यवहार करतील.

शेअर्सची स्थिती काय?

या शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांक आणि नीचांकी स्तर अनुक्रमे ४,५४२ रुपये आणि ९०२.१० रुपये आहे. बीएसईवर आतापर्यंत सहा महिन्यांत स्काय गोल्डच्या शेअरमध्ये तब्बल २७० टक्क्यांची वाढ झाली आहे. वार्षिक आधारावर शेअरमध्ये ३५५ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. जानेवारी २०२४ च्या सुरुवातीला स्काय गोल्डचा शेअर फक्त ९९६ रुपयांवर होता. आशिष कचोलिया हे बंगाल फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडमधील गुंतवणूकदार असून ते स्काय गोल्डचे प्रमुख पब्लिक शेअरहोल्डर आहेत. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत, बीएसईवरील शेअरहोल्डिंग पॅटर्नवरील आकडेवारीनुसार बंगाल फायनान्सकडे स्काय गोल्डमध्ये सुमारे २,५२,९०० इक्विटी शेअर्स किंवा १.७३% हिस्सा आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक