Lokmat Money >शेअर बाजार > एका शेअरवर ९ शेअर्स देतेय ही कंपनी; पुढच्या आठवड्यात रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी उड्या

एका शेअरवर ९ शेअर्स देतेय ही कंपनी; पुढच्या आठवड्यात रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी उड्या

Sky Gold Limited Share Price : बुधवारी व्यवहारादरम्यान कंपनीचा शेअर ३ टक्क्यांनी वधारून ४,५२० रुपयांवर पोहोचला. ही कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 02:23 PM2024-12-11T14:23:50+5:302024-12-11T14:23:50+5:30

Sky Gold Limited Share Price : बुधवारी व्यवहारादरम्यान कंपनीचा शेअर ३ टक्क्यांनी वधारून ४,५२० रुपयांवर पोहोचला. ही कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत आहे.

Sky Gold Limited shares is offering 9 shares for one share Record date 16 december jump to buy shares | एका शेअरवर ९ शेअर्स देतेय ही कंपनी; पुढच्या आठवड्यात रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी उड्या

एका शेअरवर ९ शेअर्स देतेय ही कंपनी; पुढच्या आठवड्यात रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी उड्या

Sky Gold Limited Share Price : प्रसिद्ध गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांचा पाठिंबा असलेल्या स्काय गोल्ड लिमिटेड (Sky Gold Limited) या जेम्स अँड ज्वेलरी कंपनीचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आहेत. बुधवारी व्यवहारादरम्यान कंपनीचा शेअर ३ टक्क्यांनी वधारून ४,५२० रुपयांवर पोहोचला. ही कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत आहे. या शेअरमध्ये सातत्यानं वाढ होत असून या वर्षी आतापर्यंत त्यात ३६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनी आपल्या प्रत्येक पात्र शेअरहोल्डरला ९ फ्री शेअर्स देत आहे. त्यासाठी रेकॉर्ड डेटही निश्चित करण्यात आली आहे.

काय म्हणाली कंपनी?

कंपनीने शेअर बाजाराला यासंदर्भातील माहिती दिली. सोमवार १६ डिसेंबर रोजी १:९ या प्रमाणात बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलंय. म्हणजेच जर तुमच्याकडे ठरलेल्या तारखेपर्यंत कंपनीचा एक शेअर असेल तर त्या बदल्यात तुम्हाला ९ फ्री शेअर्स मिळतील. याशिवाय चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत स्काय गोल्डनं जबरदस्त नफा कमावलाय. याचाही सकारात्मक परिणाम शेअरवर झाला आहे.

शेअर्सची स्थिती काय?

या शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांक आणि नीचांकी स्तर अनुक्रमे ४,५४२ रुपये आणि ९०२.१० रुपये आहे. बीएसईवर आतापर्यंत सहा महिन्यांत स्काय गोल्डच्या शेअरमध्ये तब्बल २७० टक्क्यांची वाढ झाली आहे. वार्षिक आधारावर शेअरमध्ये ३५५ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. जानेवारी २०२४ च्या सुरुवातीला स्काय गोल्डचा शेअर फक्त ९९६ रुपयांवर होता. आशिष कचोलिया हे बंगाल फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडमधील गुंतवणूकदार असून ते स्काय गोल्डचे प्रमुख पब्लिक शेअरहोल्डर आहेत. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत, बीएसईवरील शेअरहोल्डिंग पॅटर्नवरील आकडेवारीनुसार बंगाल फायनान्सकडे स्काय गोल्डमध्ये सुमारे २,५२,९०० इक्विटी शेअर्स किंवा १.७३% हिस्सा आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Sky Gold Limited shares is offering 9 shares for one share Record date 16 december jump to buy shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.