Lokmat Money >शेअर बाजार > Slone Infosystems IPO Listing: ३ दिवसांमध्ये ७०० पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन, आता IPO नं पहिल्याच दिवशी केलं मालामाल 

Slone Infosystems IPO Listing: ३ दिवसांमध्ये ७०० पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन, आता IPO नं पहिल्याच दिवशी केलं मालामाल 

Slone Infosystems IPO Listing: शेअर बाजारात कंपनीचं जबरदस्त लिस्टिंग झालं. एनएसई एसएमईवर कंपनीच्या आयपीओचं लिस्टिंग ५० टक्के प्रीमियमसह ११८.५० रुपयांवर झालं.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 02:15 PM2024-05-10T14:15:41+5:302024-05-10T14:16:01+5:30

Slone Infosystems IPO Listing: शेअर बाजारात कंपनीचं जबरदस्त लिस्टिंग झालं. एनएसई एसएमईवर कंपनीच्या आयपीओचं लिस्टिंग ५० टक्के प्रीमियमसह ११८.५० रुपयांवर झालं.

Slone Infosystems IPO Listing Over 700 x Subscription in 3 Days Now IPO Makes Money on First Day | Slone Infosystems IPO Listing: ३ दिवसांमध्ये ७०० पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन, आता IPO नं पहिल्याच दिवशी केलं मालामाल 

Slone Infosystems IPO Listing: ३ दिवसांमध्ये ७०० पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन, आता IPO नं पहिल्याच दिवशी केलं मालामाल 

Slone Infosystems IPO Listing: स्लोन इन्फोसिस्टीमच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मालामाल झालेत. शेअर बाजारात कंपनीचं जबरदस्त लिस्टिंग झालं. एनएसई एसएमईवर स्लोन इन्फोसिस्टीम्सच्या आयपीओचं लिस्टिंग ५० टक्के प्रीमियमसह ११८.५० रुपयांवर झालं. आयपीओचा प्राइस बँड ७९ रुपये प्रति शेअर होता. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांकी स्तर ११९.४५ रुपये प्रति शेअर होता. दमदार लिस्टिंगनंतर स्लोन इन्फोसिस्टीम्सचा शेअर नफा वसुलीचा बळी ठरला. कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून ११२.६० रुपयांवर आला.
 

लॉट साइज काय?
 

स्लोन इन्फोसिस्टीम्सच्या आयपीओचा लॉट साइज १६०० शेअर्सची होती. ज्यामुळे एका गुंतवणूकदाराला किमान १ लाख २६ हजार ४०० रुपयांची गुंतवणूक करावी लागली. कंपनीच्या आयपीओची साईज ११.०६ कोटी रुपये होती. कंपनीनं आयपीओच्या माध्यमातून १४ लाख नवे शेअर्स जारी केले आहेत.
 

२ दिवसात ७०० पटींपेक्षा जास्त सब्सक्रिप्शन
 

हा आयपीओ ३ मे ते ७ मे या कालावधीत गुंतवणूकदारांसाठी खुला होता. सुरुवातीच्या ३ दिवसांत हा आयपीओ ७६५ पटींपेक्षा अधिक सब्सक्राइब झाला होता. शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांमध्ये आयपीओमध्ये गुंतवणूकीसाठी स्पर्धा सुरू असल्याचं दिसून आलं. यामुळे ७ मे रोजी सर्वाधिक सब्सक्रिप्शन ६६७.८१ पट झालं होतं. कंपनीच्या आयपीओला पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अनुक्रमे २०.६८ पट आणि ७८.१४ पट सब्सक्रिप्शन मिळालं. आयपीओनंतर प्रवर्तकांचा हिस्सा ७३.०१ टक्क्यांवर आला आहे.
 

ही कंपनी काय करते?
 

स्लोन इन्फोसिस्टम्स लिमिटेड आयटी हार्डवेअर सोल्यूशन्स पुरवणारी कंपनी आहे. कंपनी लॅपटॉप, डेस्कटॉप, सर्व्हर आणि वर्क स्टेशनची विक्री करते. तसंच ग्राहकांना भाड्यानंबी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. लिस्टिंगनंतर या कंपनीचे मार्केट कॅप ५९.३३ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Slone Infosystems IPO Listing Over 700 x Subscription in 3 Days Now IPO Makes Money on First Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.