Join us  

12 महिन्यांत हा Small Cap IT Stock ₹3500 वर जाण्याची शक्यता, वर्षभरात मिळाला 90 टक्क्यांचा रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 2:56 PM

Small Cap IT Stocks to Buy: कंपनीचा भारतासह 40 पेक्षा अधिक देशांमध्ये व्यवसाय आहे.

Small Cap IT Stocks to Buy:शेअर बाजारात आज (19 फेब्रुवारी) तेजी पाहायला मिळाली. यामुळे अनेक शेअर्स मजबूत स्थितीत दिसत आहेत. अशातच, ब्रोकरेज हाऊस ICICI Direct ने खरेदीसाठी स्मॉल कॅप आयटी कंपनी मास्टेकची (Mastek) निवड केली आहे. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, नवीन अधिग्रहणामुळे कंपनीचा विस्तार झाला आहे, याचा सकारात्मक परिणाम होईल. विशेष म्हणजे, गेल्या एका वर्षात याने 90 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

मास्टेक शेअर किंमत: ₹3500 ला स्पर्श करेलब्रोकरेज हाऊस ICICI Direct ने मास्टेकच्या खरेदीचा सल्ला दिला आहे. तसेच, 12 महिन्यांच्या दृष्टीकोनातून प्रति शेअर लक्ष्य किंमत 3500 रुपये ठेवण्यात आली आहे. 16 फेब्रुवारी 2024 रोजी शेअरची किंमत 3091 रुपयांवर बंद झाली होती. अशा स्थितीत हा शेअर पुढील 1 वर्षात 13-14 टक्के परतावा देऊ शकतो. 

कंपनीची व्याप्तीIT क्षेत्रातील कंपनी मास्टेक भारत, UK, US, मध्य पूर्व आणि एशिया पॅसिफिकमध्ये डेटा, ॲप्स, क्लाउड सेवा देते. कंपनीचे 40 पेक्षा जास्त देशांमध्ये ग्राहक आहेत आणि सक्रिय ग्राहकांची संख्या 400 पेक्षा जास्त आहे.

ब्रोकरेजचे मत काय?ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, मास्टेकने गेल्या 18 महिन्यांत आपल्या व्यवसायात विविधता आणली आहे. कंपनीने अमेरिकेत व्यवसाय वाढवला आहे. कंपनीने MST सोल्युशन्स आणि BusinessAnalytica विकत घेतले आहे. तसेच, कंपनीचा US मधील महसूल FY21 मधील 16.7 टक्क्यांवरून FY23 मध्ये 24.4 टक्क्यांपर्यंत वाढला. ब्रोकरेजचा विश्वास आहे की, यूएसमध्ये कंपनीच्या वाढीस चालना मिळेल आणि एकूण महसुलात चांगली वाढ होईल.

(टीप: आम्ही फक्त शेअरच्या कामगिरीविषयी माहिती दिली आहे. ब्रोकरेजचे मत वैयक्तिक आहे. शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक