Small Cap Share: शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीची आहे, पण कधी कोणता शेअर बंपर कमाई करुन देईल, काही सांगता येत नाही. योग्य शेअरवर पैसे लावले की, कमाई नक्की होते. आज आम्ही तुम्हाला 1 रुपयाच्या स्टॉकबद्दल सांगणार आहोत. या शेअरने 5 वर्षात उत्कृष्ट परतावा दिला आहे. 5 वर्षात 1 रुपये किमतीच्या शेअरने 500 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
1 रुपयांचा शेअर 550 रुपयांच्या पुढे आम्ही स्मॉलकॅप कंपनी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलत आहोत. गेल्या 5 वर्षांत ऑथम इन्व्हेस्टमेंटचे शेअर्स 1 रुपयावरुन 550 रुपयांवर गेले आहेत. या कालावधीत ऑथम इन्व्हेस्टमेंटचे शेअर्स 44000 टक्क्यांहून अधिक वाढले. ऑथम इन्व्हेस्टमेंटचे शेअर्स मंगळवारी 16.29 टक्क्यांच्या वाढीसह 561.20 रुपयांवर बंद झाले.
नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी ऑथम इन्व्हेस्टमेंटचा शेअर 7 डिसेंबर 2018 रोजी 1.27 रुपयांवर होता. हा 3 ऑक्टोबर 2023 रोजी 561.20 रुपयांवर पोहोचला. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 7 डिसेंबर 2018 रोजी ऑथम इन्व्हेस्टमेंटच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर त्या शेअर्सचे सध्याचे मूल्य 4.43 कोटी रुपये झाले असते.
कंपनीचे शेअर्स 6 महिन्यांत 186% वाढलेऑथम इन्व्हेस्टमेंटचे शेअर्स गेल्या 6 महिन्यांत 186 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या एका वर्षात या शेअरने 126 टक्के परतावा दिला आहे. ऑथम इन्व्हेस्टमेंटच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 580 रुपये आहे.
(टीप: आम्ही शेअरच्या कामगिरीविषयी माहिती दिली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत नक्की घ्या.)