Lokmat Money >शेअर बाजार > स्मार्ट मीटर्स लावणाऱ्या कंपनीला मिळाली ₹३६०८ कोटींची ऑर्डर; शेअर खरेदीसाठी उड्या, सातत्यानं देतोय नफा

स्मार्ट मीटर्स लावणाऱ्या कंपनीला मिळाली ₹३६०८ कोटींची ऑर्डर; शेअर खरेदीसाठी उड्या, सातत्यानं देतोय नफा

Genus Power Infrastructures Ltd Share: कंपनीचे शेअर्स आज बुधवारी ट्रेडिंगदरम्यान फोकसमध्ये होते. कंपनीच्या शेअरनं आज सुरुवातीच्या व्यवहारात ५ टक्क्यांचा उच्चांक गाठला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 10:12 AM2024-08-21T10:12:59+5:302024-08-21T10:13:26+5:30

Genus Power Infrastructures Ltd Share: कंपनीचे शेअर्स आज बुधवारी ट्रेडिंगदरम्यान फोकसमध्ये होते. कंपनीच्या शेअरनं आज सुरुवातीच्या व्यवहारात ५ टक्क्यांचा उच्चांक गाठला.

Smart meter installation company Genus Power Infrastructures Ltd Share gets rs 3608 crore order Jump to buy shares continuously giving profit | स्मार्ट मीटर्स लावणाऱ्या कंपनीला मिळाली ₹३६०८ कोटींची ऑर्डर; शेअर खरेदीसाठी उड्या, सातत्यानं देतोय नफा

स्मार्ट मीटर्स लावणाऱ्या कंपनीला मिळाली ₹३६०८ कोटींची ऑर्डर; शेअर खरेदीसाठी उड्या, सातत्यानं देतोय नफा

Genus Power Infrastructures Ltd Share: जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स आज बुधवारी ट्रेडिंगदरम्यान फोकसमध्ये होते. कंपनीच्या शेअरनं आज सुरुवातीच्या व्यवहारात ५ टक्क्यांचा उच्चांक गाठला. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरनं आज इंट्राडेमध्ये ४३८.३५ रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला. शेअर्समधील या तेजीमागे मोठी ऑर्डर आहे. कंपनीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीला ३,६०८.५२ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.

स्टॉक स्टेटस

जीनस पॉवरचं मार्केट कॅप आता वाढून १३,३१५.०८ कोटी रुपये झालंय. जीनस पॉवरच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना दोन वर्षांत ४३७.६७ टक्के मल्टीबॅगर परतावा दिलाय. या शेअरनं वर्षभरात १०५ टक्के परतावा दिला. तीन वर्षांत हा शेअर ५८० टक्क्यांनी वधारला. तांत्रिक बाबींच्या बाबतीत, जीनस पॉवरचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (आरएसआय) ६९.५ आहे, यावरून तो ओव्हरबाय किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही हे दिसून येतं. १४ मार्च २०२४ रोजी जीनस पॉवरचा शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर २०४.६० रुपयांवर घसरला होता. 

काय आहे ऑर्डर?

एफएमएससह सुमारे ४.२६ दशलक्ष स्मार्ट प्रीपेड मीटरच्या एफएमएससह सप्लाय, कमिशनिंगसह अॅडव्हान्स्ड मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर (एएमआय) प्रणालीचं डिझाईन, रिलेटेड एनर्जी अकाऊंटिंगसोबत डीटी मीटरसह सिस्टमचा ऑर्डरमध्ये समावेश आहे. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक जितेंद्रकुमार अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्या कंपनीला ३,६०८.५२ कोटी रुपयांच्या (कर वगळून) तीन नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत. या ताज्या ऑर्डर्समुळे सर्व एसपीव्ही आणि जीआयसी प्लॅटफॉर्मसह आमची एकूण ऑर्डर बुक सुमारे २८,००० कोटी रुपये झाली आहे. 

आम्ही कंपनीची मजबूत भविष्यातील वाढ, गुणवत्ता, नाविन्यपूर्णता आणि ग्राहकांचे समाधान राखण्यास समर्पित आहोत, असंही ते म्हणाले. जीनस पॉवर प्रामुख्याने मीटरिंग आणि मीटरिंग सोल्यूशन्सचे उत्पादन/प्रदान करणं आणि टर्नकी आधारावर इंजिनिअरिंग, बांधकामात गुंतलेली आहे. कंपनी मीटरिंग व्यवसाय आणि धोरणात्मक गुंतवणूक अशा दोन विभागांद्वारे कामकाज करते.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Smart meter installation company Genus Power Infrastructures Ltd Share gets rs 3608 crore order Jump to buy shares continuously giving profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.