SME Multibagger Stock: देशांतर्गत शेअर बाजारात सुरू असलेल्या तेजीदरम्यान वृद्धी इंजिनीअरिंग वर्क्सच्या (Vruddhi Engineering Works) शेअरनं गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. २१ जून रोजी कंपनीचा शेअर ७० रुपयांच्या इश्यू प्राइसवरून ३७० टक्क्यांनी वधारून ३२८.८५ रुपयांवर पोहोचला. कंपनीचा शेअर ३ एप्रिल २०२४ रोजी बीएसई एसएमई एक्सचेंजवर लिस्ट झाला. कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ३८८.५० रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ७१ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ८२.९९ कोटी रुपये आहे.
मार्चमध्ये आलेला आयपीओ
२६ मार्च रोजी हा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला. हा आयपीओ २६ ते २८ मार्च पर्यंत खुला होता. वृद्धी इंजिनीअरिंग वर्क्सचा आयपीओ हा बुक बिल्ड इश्यू आयपीओ होता. वृद्धी इंजिनीअरिंग वर्क्सच्या आयपीओसाठी प्राईज बँड ६६ ते ७० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवसांत या आयपीओला सुमारे १३.४१ पट सब्सक्रीप्शन मिळालं होतं. कंपनीच्या आयपीओमध्ये सुमारे २ टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला होता. फेडेक्स सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड ही वृद्धी इंजिनीअरिंग वर्क्सच्या आयपीओची बुक रनिंग लीड मॅनेजर होती.
कंपनी काय करते?
रिबार कपलर डिझाइन, इंजिनीअरिंग आणि सप्लाय करून रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रा इंडस्ट्रीला मेकॅनिकल स्प्लिसिंग सोल्यूशन्स पुरवण्याचं काम वृद्धी इंजिनीअरिंग वर्क्स करते. यात रिबार कपलर्सचा पुरवठा, कपल्सची ऑन-साइट थ्रेडिंग सेवा, ग्राहकांच्या गरजेनुसार थ्रेडिंग मशिन्स आणि स्पेअर्सचा ट्रेडिंग उपलब्ध आहे. वृद्धी इंजिनीअरिंग वर्क्सनं ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या कालावधीपर्यंत ९.३५ कोटी रुपयांचा महसूल आणि ०.४१ कोटी रुपयांचा नफा नोंदविला होता.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)