Lokmat Money >शेअर बाजार > Ganesh Green Bharat IPO: १००% प्रीमिअमवर लिस्ट झाला सोलार कंपनीचा IPO, पहिल्याच दिवशी पैसे डबल; ३०० पार पोहोचला भाव

Ganesh Green Bharat IPO: १००% प्रीमिअमवर लिस्ट झाला सोलार कंपनीचा IPO, पहिल्याच दिवशी पैसे डबल; ३०० पार पोहोचला भाव

Ganesh Green Bharat IPO: सोलर पीव्ही मॉड्यूल उत्पादक कंपनीचा शेअर शुक्रवारी शेअर बाजारात लिस्ट झाला आहे. एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची जबरदस्त लिस्टिंग झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 10:52 AM2024-07-12T10:52:04+5:302024-07-12T10:52:35+5:30

Ganesh Green Bharat IPO: सोलर पीव्ही मॉड्यूल उत्पादक कंपनीचा शेअर शुक्रवारी शेअर बाजारात लिस्ट झाला आहे. एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची जबरदस्त लिस्टिंग झाली.

solar company listed at 100 percent premium Ganesh Green Bharat IPO double money on first day The price reached 300 above | Ganesh Green Bharat IPO: १००% प्रीमिअमवर लिस्ट झाला सोलार कंपनीचा IPO, पहिल्याच दिवशी पैसे डबल; ३०० पार पोहोचला भाव

Ganesh Green Bharat IPO: १००% प्रीमिअमवर लिस्ट झाला सोलार कंपनीचा IPO, पहिल्याच दिवशी पैसे डबल; ३०० पार पोहोचला भाव

Ganesh Green Bharat IPO: सोलर पीव्ही मॉड्यूल उत्पादक गणेश ग्रीन भारतचा शेअर शुक्रवारी शेअर बाजारात लिस्ट झाला आहे. एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची जबरदस्त लिस्टिंग झाली. गणेश ग्रीन भारतचा शेअर आज १९० रुपयांच्या आयपीओच्या किंमतीच्या तुलनेत ३७९.०५ रुपयांवर लिस्ट झाला. म्हणजेच पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांनी ९९.५ टक्के दमदार नफा कमावला. 

लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअरमध्ये ५ टक्के अपर सर्किट लागलं. सोलर पीव्ही मॉड्यूल उत्पादक गणेश ग्रीन भारत आयपीओच्या माध्यमातून १२५.२३ कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. आयपीओसाठी प्राइस बँड १८१ ते १९० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता.

५ जुलै रोजी आयपीओ खुला

हा आयपीओ ५ जुलै रोजी खुला झाला आणि ९ जुलै रोजी बंद झाला. हा आयपीओ एनएसई एसएमई प्लॅटफॉर्म इमर्जवर लिस्ट करण्याचा प्रस्ताव होता. आयपीओ हा निव्वळ ६५.९१ लाख नव्या शेअर्सचा इश्यू आहे. गणेश ग्रीनची स्थापना एप्रिल २०१६ मध्ये झाली. हे सौर पीव्ही मॉड्यूल उत्पादन, विद्युत करार सेवा आणि पाणी पुरवठा योजना प्रकल्पांवर काम करते. अहमदाबादच्या या कंपनीची एकूण स्थापित क्षमता २३६.७३ मेगावॅट आहे.

कशी असेल मार्केटची स्थिती?

अलीकडेच म्युच्युअल फंड कंपनी फ्रँकलिन टेम्पलटननं म्हटलं की, गुंतवणूकदारांसाठी इक्विटी शेअर बाजारातील परतावा पुढील तीन वर्षांत गेल्या तीन वर्षांइतका चांगला राहणार नाही. मुख्य गुंतवणूक अधिकारी (इमर्जिंग मार्केट इक्विटी) आर जानकीरमण यांनी, नव्यानं सूचीबद्ध कंपन्या मोठ्या प्रमाणात आयपीओकडे लक्ष वेधत गुंतवणूक केली जाणारी अतिरिक्त रक्कम काढून घेण्याचं मार्ग तयार करीत आहेत. कंपन्यांमधील इक्विटी परतावा गेल्या काही वर्षांपासून उत्पन्न वाढीपेक्षा चांगला आहे आणि गुंतवणूकदारांना आता याच्या उलट करण्याची तयारी ठेवावी लागणार असल्याचं म्हटलं.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: solar company listed at 100 percent premium Ganesh Green Bharat IPO double money on first day The price reached 300 above

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.