Lokmat Money >शेअर बाजार > सोलार कंपन्यांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल, वर्षभरात दिला 1300 टक्क्यांहून अधिक परतावा...

सोलार कंपन्यांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल, वर्षभरात दिला 1300 टक्क्यांहून अधिक परतावा...

या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दमदार रिटर्न्स मिळाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 04:46 PM2024-05-10T16:46:08+5:302024-05-10T16:46:17+5:30

या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दमदार रिटर्न्स मिळाले आहेत.

Solar Company Stocks: Solar companies have been a boon to investors, giving returns of over 1300 percent in a year | सोलार कंपन्यांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल, वर्षभरात दिला 1300 टक्क्यांहून अधिक परतावा...

सोलार कंपन्यांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल, वर्षभरात दिला 1300 टक्क्यांहून अधिक परतावा...

Solar Company Stocks : गेल्या काही वर्षांपासून देशातील सोलार एनर्जी क्षेत्रात झपाट्याने वाढत होत आहे. या वाढीचा परिणाम शेअर बाजारावरही दिसतोय. या क्षेत्रातील शेअर बाजारावर लिस्टेड काही कंपन्यांनी वर्षभरात दमदार कामगिरी केली आहे. या काळात या कंपन्यांनी 1300 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 

1- WAA सोलर: वर्षभरात या शेअर्सच्या किमतीत 527 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आपण गेल्या 6 महिन्यांबद्दल बोललो, तर या कालावधीत स्टॉकच्या किमतीत 201 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, गेल्या महिन्याभरात या शेअरने 80 टक्के परतावा दिला आहे. शुक्रवारी या एका शेअरची किंमत 236.90 रुपयांवर आली. 

2- SJVN: या कंपनीच्या शेअरची किंमत सुमारे 126 रुपये आहे. शुक्रवारी कंपनीचे शेअर 1 टक्क्यांहून अधिक वाढले. गेल्या एका वर्षात SJVN च्या शेअर्सची किंमत 235 टक्क्यांनी वाढली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपासून शेअर्स घेतले, त्यांना आतापर्यंत 68 टक्के नफा मिळाला आहे. 

3- Waaree Renewable Technologies: या कंपनीच्या शेअरच्या किमतीत आज 5 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. कंपनीच्या शेअर्सची किंमत 2564 रुपयांपर्यंत घसरली. गेल्या एका वर्षात या कंपनीने शेअर बाजारातील स्थिर गुंतवणूकदारांना 1300 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. कंपनीची 52 आठवड्यांची उच्च पातळी 3037.75 रुपये आहे, तर 52 आठवड्यांची निम्न पातळी 157.02 रुपये प्रति शेअर आहे. कंपनीचे मार्केट कॅप रु 26,703.87 कोटी आहे.

(टीप-हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Solar Company Stocks: Solar companies have been a boon to investors, giving returns of over 1300 percent in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.