Join us  

9 रुपयांचा शेअर पोहोचला 7000 रुपयांवर; फक्त चार वर्षात गुंतवणूकदार झाले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 6:08 PM

कंपनीने 4 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 78000% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

Share Market: सोलर कंपनी वारी रिन्युएबलच्या शेअर्सने सध्या वेग पकडला आहे. Waaree Renewable चे शेअर्स बुधवारी 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 7090.50 रुपयांवर पोहोचले. गेल्या 5 दिवसात या शेअर्समध्ये 35% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. आता Waari Renewable 1:5 च्या प्रमाणात त्यांचे शेअर्स विभागत आहे. कंपनीने स्टॉक विभाजनाची तारीख 16 मार्च 2024 निश्चित केली आहे. Waari Renewables त्यांच्या रु. 5 दर्शनी किमतीचे शेअर्स रु. 1 दर्शनी किमतीच्या शेअर्समध्ये विभागत आहे.

कंपनीच्या शेअर्सने रु. 9 वरुन ते रु. 7000 चा टप्पा ओलांडलाWaaree Renewable च्या शेअर्सने 4 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 78000% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. 22 मे 2020 रोजी कंपनीचे शेअर्स 9 रुपयांवर होते. हे शेअर्स 6 मार्च 2024 रोजी 7090.50 रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअर्ससाठी हा 52 आठवड्यांचा नवा उच्चांक आहे. विशेष म्हणजे, गेल्या 3 वर्षांत वारी रिन्युएबलचे शेअर्स 17919% वाढले आहेत. 5 मार्च 2021 रोजी कंपनीचे शेअर्स 39.35 रुपयांवर होते.

1 वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 1025% वाढकंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या एका 1025% वाढ झाली आहे. वारी रिन्युएबलचे शेअर्स 6 मार्च 2023 रोजी 630.15 रुपयांवर होते, जे 6 मार्च 2024 रोजी 7090.50 रुपयांवर पोहोचले. तर, गेल्या 6 महिन्यांत 459% परतावा दिला आहे. विशेष बाब म्हणजे, या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 223% वाढ झाली आहे.

(टीप- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक