Lokmat Money >शेअर बाजार > Som Distilleries Share: शेअर बाजारातील लिस्टेड कंपनीचा लायसन्स रद्द; बाल मजुरांकडून काम करवण्याचा आरोप, शेअरवर परिणाम होणार?

Som Distilleries Share: शेअर बाजारातील लिस्टेड कंपनीचा लायसन्स रद्द; बाल मजुरांकडून काम करवण्याचा आरोप, शेअरवर परिणाम होणार?

Som Distilleries Share: शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या एका मद्याच्या कंपनीला मोठा धक्का बसला आहे. रायसेन जिल्ह्यात १९ जून रोजी बालमजुरांची सुटका झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारनं या कंपनीचा परवाना निलंबित केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 08:44 AM2024-06-20T08:44:52+5:302024-06-20T08:47:50+5:30

Som Distilleries Share: शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या एका मद्याच्या कंपनीला मोठा धक्का बसला आहे. रायसेन जिल्ह्यात १९ जून रोजी बालमजुरांची सुटका झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारनं या कंपनीचा परवाना निलंबित केला आहे.

Som Distilleries Share Cancellation of license of listed company in stock market Allegations of child labor will affect shares | Som Distilleries Share: शेअर बाजारातील लिस्टेड कंपनीचा लायसन्स रद्द; बाल मजुरांकडून काम करवण्याचा आरोप, शेअरवर परिणाम होणार?

Som Distilleries Share: शेअर बाजारातील लिस्टेड कंपनीचा लायसन्स रद्द; बाल मजुरांकडून काम करवण्याचा आरोप, शेअरवर परिणाम होणार?

Som Distilleries Share: शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या सोम डिस्टिलरीज आणि ब्रुअरीजला मोठा धक्का बसला आहे. रायसेन जिल्ह्यात १९ जून रोजी बालमजुरांची सुटका झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारनं सोम डिस्टिलरीजचा (Som Distilleries) परवाना निलंबित केला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिसूचनेनुसार, मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील एका मद्याच्या कारखान्यातून बालमजुरांची सुटका करण्यात आली. या अल्पवयीन मुलांना पोलीस पडताळणी न करता सोम डिस्टिलरीजच्या युनिटमध्ये काम देण्यात आलं होतं, असंही विभागानं म्हटलंय. या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. सोम डिस्टिलरीजचे निलंबन २० दिवसांसाठी किंवा कामगार विभागाकडून कामकाज सुरू करण्यास परवानगी मिळेपर्यंत कायम राहणार आहे.
 

शेअरमध्ये मोठी घसरण झाली
 

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं (एनसीपीसीआर) मध्य प्रदेशातील या कंपनीच्या उपकंपनीच्या डिस्टिलरीतून ३९ मुले आणि १९ मुलींची सुटका केली होती. हे सर्व बालमजूर होते. या वृत्तानंतर सोम डिस्टिलरीजचा शेअर मंगळवारी तब्बल १६ टक्क्यांनी घसरला. मात्र, बुधवारच्या व्यवहारात हा शेअर किरकोळ घसरला आणि बीएसईवर तो ११५.८५ रुपयांवर व्यवहार करत होता. सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज हा बिअर, आयएमएफएल (भारतीय बनावटीचं विदेशी मद्य) आणि आरटीडी (रेडी टू ड्रिंक) पेयं तयार आणि पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचा आयएसओ-प्रमाणित गट आहे.
 

कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
 

सोम डिस्टिलरीजनं १७ जून रोजी याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. कारखान्यामध्ये कामासाठी कामगारांचा पुरवठा करण्याचं काम कंत्राटदारांकडून करण्यात येतं. आम्ही तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की आमच्या कंपनीचे सर्व प्लांट लागू कायद्यांचं पूर्णपणे पालन करतात आणि त्यांच्याकडे सर्व आवश्यक परवानग्या आहेत, असं कंपनीनं म्हटलं. सोम डिस्टिलरीजच्या भोपाळ प्रकल्पात सध्या वर्षाला १.५२ कोटी बिअर आणि ०.६ दशलक्ष भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची क्षमता आहे. भोपाळ प्रकल्पातून राजस्थान, झारखंड आणि उत्तर प्रदेश भागातही कंपनी सेवा देत आहे.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Som Distilleries Share Cancellation of license of listed company in stock market Allegations of child labor will affect shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.