SPARC shares: सन फार्मा अॅडव्हान्स्ड रिसर्च कंपनी (एसपीएआरसी) लिमिटेडच्या शेअरमध्ये १४ दिवसांच्या घसरणीवर ब्रेक लागला आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी हा शेअर ४ टक्क्यांपर्यंत वधारला. व्यवहारादरम्यान शेअरचा भाव २४३.८५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. सलग १३ दिवस या शेअरने ५ टक्क्यांची नीचांकी पातळी गाठली आणि एकूण १४ दिवसांत या शेअरमध्ये ४९ टक्क्यांची घसरण झाली.
घसरणीची कारणं काय ?
खरं तर, व्होडोबॅटिनिबवर एक PROSEEK स्टडी करण्यात आली होती. पार्किन्सन आजाराच्या रुग्णांसाठी हा अभ्यास करण्यात आला. अभ्यासाच्या परिणामांनुसार, व्होडोबॅटिनिब घेणाऱ्या रूग्णांना उपचारात फायदा झाला नाही. ४४२ रूग्णांनी प्रोसीक अभ्यासाचा भाग -१ पूर्ण केल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. आता कंपनीनं हा अभ्यास बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीसाठी हा मोठा धक्का आहे. पार्किन्सन, लेवी बॉडी डिमेंशिया आणि अल्झायमरसाठी याचा अभ्यास केला जात होता. पार्किन्सन हा आजार एक प्रोगरेसिव्ह न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे.
कोणाचा किती हिस्सा?
सन फार्मा अॅडव्हान्स्ड रिसर्च कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे झाले तर ६५.६७ टक्के हिस्सा प्रवर्तकाकडे आहे. तर, पब्लिक शेअरहोल्डर्सकडे ३४.३३ टक्के शेअर्स आहेत. प्रवर्तक कंपन्यांमध्ये सांघवी फायनान्सचा एसपीएआरसीमध्ये ४२.२८ टक्के, तर सन फार्माच्या दिलीप सांघवी यांचा १९.०५ टक्के हिस्सा आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)