Lokmat Money >शेअर बाजार > श्री श्री रविशंकर कोणत्या कंपनीचे मालक आहेत माहितीये? जाणून घ्या, शेअरही बनला रॉकेट

श्री श्री रविशंकर कोणत्या कंपनीचे मालक आहेत माहितीये? जाणून घ्या, शेअरही बनला रॉकेट

Sri Sri Ravi Shankar Stock : श्री श्री रविशंकर यांच्याशी संबंधित कंपनीच्या शेअरमध्ये सोमवारी २० टक्क्यांची वाढ झाली. एका मोठ्या घोषणेनंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 08:32 AM2024-06-25T08:32:35+5:302024-06-25T08:35:12+5:30

Sri Sri Ravi Shankar Stock : श्री श्री रविशंकर यांच्याशी संबंधित कंपनीच्या शेअरमध्ये सोमवारी २० टक्क्यांची वाढ झाली. एका मोठ्या घोषणेनंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.

sri-sri-ravi-shankar-stock-share-20-upper-circuit-price-below-rs-150-check-trigger-source-natural-foods-and-herbal-supplements-limited | श्री श्री रविशंकर कोणत्या कंपनीचे मालक आहेत माहितीये? जाणून घ्या, शेअरही बनला रॉकेट

श्री श्री रविशंकर कोणत्या कंपनीचे मालक आहेत माहितीये? जाणून घ्या, शेअरही बनला रॉकेट

श्री श्री रविशंकर यांच्याशी संबंधित कंपनी सोर्स नॅचरल फूड्स अँड हर्बल सप्लीमेंट्सच्या शेअरमध्ये सोमवारी २० टक्क्यांची वाढ झाली. हरित ऊर्जेच्या क्षेत्रात कंपनीच्या प्रवेशाच्या घोषणेनंतर ही तेजी आली आहे. सोमवारी शेअर बाजारात कंपनीचा शेअर १२७.१८ रुपयांवर बंद झाला. श्री श्री रविशंकर यांना गुरुदेव म्हणूनही ओळखलं जातं. ते सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आहेत.

श्री श्री रविशंकर सोर्स नॅचरल फूड्स अँड हर्बल सप्लीमेंट्सचे संस्थापक आहेत. ग्रीन एनर्जीच्या क्षेत्रात शक्यतांचा शोध घेत असल्याचं कंपनीनं शेअर बाजाराला सांगितलं आहे. सौर ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, पवन ऊर्जा, जैवऊर्जा आणि जलविद्युत या सारख्या क्षेत्रांमध्ये संधींचा शोध घेणार असल्याचं कंपनीने म्हटले आहे. कंपनी श्री श्री तत्त्व या ब्रँड नावानं आपली उत्पादनं विकते.

घोषणेनंतर शेअरमध्ये तेजी

जगभरातील उदयोन्मुख हरित ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी हरित आणि क्लिन एनर्जी क्षेत्रातील व्यवसायाच्या संधींचा शोध घेऊ इच्छितो, असं कंपनीनं बीएसईला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. हा प्रस्ताव भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन आहे, असंही कंपनीनं म्हटलं आहे. यासंदर्भात २६ जून रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे.

कंपनीच्या या घोषणेनंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. याचाच परिणाम म्हणून सोमवारी कंपनीच्या समभागांनी जोरदार उसळी घेत २० टक्क्यांच्या अपर सर्किटला स्पर्श केला. बीएसईवर कंपनीचा शेअर १२७.१८ रुपयांवर बंद झाला.

किती मिळालाय रिटर्न?

गेल्या आठवडाभरात कंपनीच्या शेअरमध्ये ३३.५४ टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या महिन्याभरात शेअरमध्ये ४९.७१ टक्के वाढ झालीये. गेल्या वर्षभरात कंपनीनं ३६.७५ टक्के परतावा दिला आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत हा परतावा -२२.४५ टक्के राहिला आहे.

सोर्स नॅचरल फूड्स अँड हर्बल सप्लीमेंट्सची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली. ही कंपनी आयुर्वेद, हेल्थ आणि डाएटरी सप्लिमेंटसह विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचं उत्पादन करते. कंपनीनं २००९ मध्ये तेजीनं वाढणाऱ्या आयुर्वेद उत्पादनांच्या बाजारपेठेत प्रवेश केला.

१.३ एकरमध्ये पसरलेली ही कंपनी हर्बल सप्लीमेंट्स, पर्सनल केअर आयटम्स, सेंद्रिय अन्न आणि नैसर्गिक आरोग्य उपायांसह विविध प्रकारची उत्पादनं तयार करते. ब्रँडच्या प्रॉडक्ट लाइनमध्ये आवळा कँडी, ऑर्गेनिक व्हर्जिन कोकोनट ऑइल, च्यवनप्राश, तुळशीच्या टॅबलेट्स आणि कासारी कफ सिरप सारख्या लोकप्रिय उत्पादनांचा समावेश आहे.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: sri-sri-ravi-shankar-stock-share-20-upper-circuit-price-below-rs-150-check-trigger-source-natural-foods-and-herbal-supplements-limited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.