Stanley Lifestyles IPO Listing: देशांतर्गत शेअर बाजारात मोठे चढ उतार दिसून येत आहेत. तर दुसरीकडे बेंचमार्क निर्देशांक नवी उच्चांकी पातळी गाठत आहे. आज शेअर बाजारात आणखी एक कंपनी लिस्ट झाली. या कंपनीची शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री झालीये. लक्झरी फर्निचर तयार करणारी कंपनी Stanley Lifestyles चा आयपीओ आज शेअर बाजारात प्रीमिअमवर लिस्ट झाला.
५३७ कोटी रुपयांचा हा आयपीओ गुंतवणूकीसाठी २१ जून ते २५ जून या कालावधीत खुला होता. यासाठी कंपनीनं ३५५ ते ३६९ रुपये इश्यू प्राइस ठेवली होती, परंतु शेअर बाजारावर हा शेअर ४९४.९५ रुपयांवर लिस्ट झाला. तर बीएसईवर तो ४९९ रुपयांवर लिस्ट झाला. कंपनीचा शेअर बीएसईवर ३५.२३% प्रीमियमसह ४९९ रुपयांवर आणि एनएसईवर ३४.१३% प्रीमियमसह ४९४.९५ रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगनंतर हा शेअरही वधारला आणि ५१० रुपयांच्या पातळीवर पोहोचला.
Stanley Lifestyles नं या आयपीओच्या माध्यमातून एकूण १४,५५३,५०८ इक्विटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले होते. कंपनी आयपीओच्या माध्यमातून एकूण ५३७.०२ कोटी रुपये उभारण्याचा विचार होता. या आयपीओमध्ये कंपनी २०० कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करणार होती, तर ३३७.०२ कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून जारी केले जाणार होते.
(टीप - यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)