Startup investment : बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असताना भारतीय स्टार्टअप इकोसिस्टमला मात्र अनुकूल वातावरण तयार झाले आहे. मागच्या आठवड्यात फंडिंग जमविण्यात स्टार्टअपना चांगले यश मिळाले आहे. १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान सर्व स्टार्टअप्सने ५९६ दशलक्ष डॉलर्स मिळवले आहेत. ही वाढ तब्बल २२६ टक्के इतकी आहे.
मागच्या आठवड्यात २४ भारतीय स्टार्टअप्सनी मागच्या आठवड्यात जवळपास १८२.६१ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला आहे. यातील तीन स्टार्टअप वाढीच्या स्थितीतल होत्या तर १९ प्राथमिक स्थितीतील होत्या. दुग्धव्यवसाय या क्षेत्रातील कंपनी दूधवाले फर्म्सने ३ दशलक्ष डॉलर्सच्या फंडिंगसाठी सुरु केलेल्या फेरीची यशस्वी समाप्ती झाल्याची घोषणा केली आहे.
कुणी कितीचे करार केले?
क्विक कॉमर्स क्षेत्रातील झेप्टो या प्लॅटफॉर्मने मोतीलाल ओस्वाल ग्रुपच्या प्रायव्हेट डिविजनच्या नेतृत्वात एका राऊंडमध्ये ३५० दशलक्ष डॉलर्सचे फंडिंग मिळवले आहे. यासोबत मागील ५ महिन्यांत गुंतवणूकदारांनी झेप्टोमध्ये १.३ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक निधी गुंतवला.
ओमनी-चॅनेल न्यूट्रिशन फ्लॅटफॉर्म हेल्थकार्टने क्रीसकॅपिटल आणि मोतीलाल ओसवाल अल्टरनेट्सच्या नेतृत्त्वात १५३ दशलक्ष डॉलर्स उभे केले आहेत.
नियो ग्रुप आणि हेल्थकार्टचे प्रमुख गुंतवणूकदार ए९१ पार्टनर्सने फंडिंगच्या राऊंडमध्ये भाग घेत ६.५ दशलक्ष डॉलर्स जमविण्याच्या योजनेची घोषणा केली.
भारतातील आघाडीचे एन्शोअरटेक प्लॅटफॉर्म झोपरने सीरिज फंडिग राऊंडमध्ये २५ दशलक्ष डॉलर्स उभारले आहेत.