Join us

सरकारी कंपनीला मिळाली ₹369 कोटी रुपयांची ऑर्डर, ₹147 वर पोहोचला भाव; खरेदीसाठी तुटून पडले लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 4:47 PM

या सरकारी बांधकाम कंपनीला एकूण 369 कोटी रुपयांच्या तीन मोठ्या वर्क ऑर्डर मिळाल्या आहेत. यात एक ऑर्डर झासी, दुसरी नोएडा, तर तिसरी ऑर्डर तेलंगणातून प्राप्त झाली आहे.

शेअर बाजारात आज मंगळवारच्या व्यवहारादरम्यान NBCC (इंडिया)चा शेअर फोकसमध्ये आहेत. हा शेअर 4.3 टक्क्यांनी वधारून 147.50 रुपयांवर पोहोचला आहे. महत्वाचे म्हणजे एका मोठ्या ऑर्डरमुळे या शेअरमध्ये ही तेजी दिसून येत आहे. या सरकारी बांधकाम कंपनीला एकूण 369 कोटी रुपयांच्या तीन मोठ्या वर्क ऑर्डर मिळाल्या आहेत. यात एक ऑर्डर झासी, दुसरी नोएडा, तर तिसरी ऑर्डर तेलंगणातून प्राप्त झाली आहे.

अशा आहेत ऑर्डर... -कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पहिली ऑर्डर झासी येथील राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठातील पायाभूत सुविधांच्या कामांसंदर्भात आहे. या ऑर्डरची किंमत 331.9 कोटी रुपये एवढी आहे. तर, दुसरी ऑर्डर ICAI भवन, नोएडा मध्ये नुतनिकरण आणइ फर्निशिंग प्रोजेक्ट्ससाठी आहे. ही ऑर्डर एकूण 24.98 कोटी रुपयांची आहे. तर तिसरी ऑर्डर म्हणजे, तेलंगणा राज्याच्या उच्च न्यायालयाने बूथ, आदिलाबाद जिल्ह्यातील सिंगल कोर्ट कॉम्प्लेक्स आणि तेलंगणा निवासी क्वार्टरच्या बांधकामासाठी रु. 12.17 कोटींची वर्क ऑर्डर मिळाली आहे.

अशी आहे कंनीच्या शेअरची स्थिती - या शेअरने 5 फेब्रुवारी 2024 आणि 28 मार्च 2023 रोजी अनुक्रमे रु. 176.50 हा 52 आठवड्यांचा उच्चांक, तर रु 30.96 हा 52 आठवड्यांचा नीचांक गाठला आहे. हा शेअर सध्या त्याच्या 52-आठवड्याच्या उच्चांकी पातळीचा विचार करता, 17.39 टक्क्यांनी खाली आहे आणि 52-आठवड्यांच्या नीचांकी पातलीचा विचार करता 370.93 टक्क्यांनी वर व्यापार करत आहे. गेल्या एका वर्षात शेअरच्या किमतीत 332 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. हा शेअर गेल्या सहा महिन्यांत 200% पेक्षाही अधिक वधारला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 25,974 कोटी रुपये एवढे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक