Sterling and Wilson shares : रिन्युएबल सोल्युशन्स प्रोव्हायडर स्टर्लिंग आणि विल्सन रिन्यूएबल एनर्जीला (Sterling and Wilson shares) एनटीपीसी (NTPC) रिन्युएबल एनर्जीकडून 1,535 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेडनं (SWRE) गुजरातमधील कच्छच्या रण येथील खवरा आरई पॉवर पार्क येथे एनटीपीसी रिन्युएबल एनर्जी लिमिटेडच्या (NTPC REL) 300 MW ईपीसी प्रकल्पाची ऑर्डर जिंकली आहे.
एका वर्षांत ३ मोठे ऑर्डर
ऑर्डरचे एकूण तीन वर्षांचे मूल्य 1,535 कोटी रुपये (करांसह) असेल. कंपनीला एनटीपीसी आरआयएलकडून एका वर्षाहून अधिक कालावधीत तिसरी ऑर्डर मिळाली आहे. दरम्यान, शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची वाढ झाली. हा शेअर इंट्राडेवर ३६४ रुपयांवर व्यवहार करत होता.
कंपनीनं काय म्हटलं
“300 मेगावॅट एसीची नवीन ऑर्डर आमच्या सध्याच्या 2.47 GW एसीच्या सेगमेंटच्या अनुषंगाने आहे जी एनटीपीसी आरईएलसाठी खवडा येथे बांधकामाधीन आहे. या ऑर्डरसह, आमची ऑर्डर चालू आर्थिक वर्षात बुकिंग ३,१०० कोटींवर पोहोचली आहे, अशी माहिती स्टर्लिंग आणि विल्सन रिन्युएबल एनर्जी ग्रुपचे ग्लोबल सीईओ अमित जैन म्हणाले.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
'या' एनर्जी कंपनीला मिळाली ₹१५३५ कोटींची ऑर्डर; गुंतवणूकदारांच्या शेअर खरेदीसाठी उड्या
एका वर्षात कंपनीला मिळाल्या ३ मोठ्या ऑर्डर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 05:01 PM2023-09-29T17:01:55+5:302023-09-29T17:02:49+5:30