Join us

वेदांता समूहाच्या कंपनीला BSNL कडून मोठी ऑर्डर! शेअर्समध्ये तेजी, तुमच्याकडे आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 12:08 PM

BSNL Order : भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) १६२५ कोटी रुपयांच्या ऑर्डरसाठी वेदांता ग्रुप कंपनी स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेडने सर्वात कमी बोली लावली आहे.

BSNL Order : सरकारी मोबाईल नेटवर्क कंपनी बीएसएनएलने देशभरात आपलं जाळं विणायला सुरुवात केली आहे. यासाठी ६५ हजार कोटी रुपयांची निविदा काढली आहे. वेदांता समूहाची ऑप्टिकल आणि डिजिटल तंत्रज्ञान कंपनी स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेडने (Sterlite Technologies Ltd) यातील एक बोली जिंकली आहे. बीएसएनएलच्या १६२५ कोटी रुपयांच्या ऑर्डरसाठी सर्वात कमी बोली लावून स्टरलाइट L1 बोलीदार बनली आहे. या डिलनंतर आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

BSNL कडून मिळाली मोठी ऑर्डरSterlite Technologies ने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, कंपनीने भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कडून १६२५ कोटी रुपयांच्या ऑर्डरसाठी सर्वात कमी बोली लावली आहे. यासाठी कंपनीला जम्मू-काश्मीरमधील भारत नेटच्या विकासावर लक्ष द्यावे लागणार आहे. ३ वर्षे बांधकाम आणि १० वर्षे देखभालीसाठी ही ऑर्डर देण्यात आली आहे.

स्टरलाइट टेक्नॉलॉजीज शेअर्स रॉकेटबीएसएनएलकडून मिळालेल्या मोठ्या ऑर्डरमुळे वेदांता ग्रुप कंपनी स्टरलाइट टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली आहे. सुरुवातीच्या व्यापारात कंपनीचे शेअर्स सुमारे ५ टक्क्यांनी वाढले आहेत. ते सध्या १२८ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १६२.९० रुपये असून ५२ आठवड्यांचा नीचांक १०९.५० रुपये आहे.

बीएसएनएलवर ग्राहकांच्या उड्याबीएसएनएल कंपनीसोबत काही दिवसांपूर्वीच टाटा कंपनीने हातमिळवणी केली आहे. त्यानंतर बीएसएनएलकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. काही दिवसांत बीएसएनएलने ६० लाखांहून अधिक ग्राहकांनी प्रवेश केला आहे. लवकरच बीएसएनएल आपली 5जी सेवा सुरू करणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात कंपनीचे नेटवर्क पोहचवण्याचे लक्ष्य आहे.

टॅग्स :बीएसएनएलशेअर बाजारशेअर बाजार