Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market : शेअर बाजारात कोणती कंपनी देते अधिक पैसा? जाणून घ्या

Stock Market : शेअर बाजारात कोणती कंपनी देते अधिक पैसा? जाणून घ्या

कोणती कंपनी देते अधिक पैसा?शेअर बाजारात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी कंपनीचा व्यवसाय लक्षात घ्यावा.

By पुष्कर कुलकर्णी | Published: October 17, 2022 10:40 AM2022-10-17T10:40:39+5:302022-10-17T10:41:00+5:30

कोणती कंपनी देते अधिक पैसा?शेअर बाजारात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी कंपनीचा व्यवसाय लक्षात घ्यावा.

Stock Marker Which company pays more money in the stock market find out companies starting from C | Stock Market : शेअर बाजारात कोणती कंपनी देते अधिक पैसा? जाणून घ्या

Stock Market : शेअर बाजारात कोणती कंपनी देते अधिक पैसा? जाणून घ्या

C - Company’s business and future growth is always important

कोणती कंपनी देते अधिक पैसा?शेअर बाजारात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी कंपनीचा व्यवसाय लक्षात घ्यावा. शेअरच्या  किमतीचा विचार नंतर करावा. स्वस्त म्हणजे उत्तम असे नसते. भविष्यात  जर व्यवसाय उत्तम तर शेअरचा भाव ही वाढणार हे निश्चित समजावे. आजच्या सदरात ‘सी’’ या अक्षरावरून सुरू होणाऱ्या काही कंपन्या ज्यातील गुंतवणूक भविष्यात देऊ  शकेल उत्तम परतावा.

चोलामंडलम फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट  
नॉनबँकिंग फायनान्शियल सेक्टरमधील उत्तम कंपनी. प्रमुख व्यवसायात होम लोन, वाहन कर्ज, प्रॉपर्टी कर्ज याचबरोबर जनरल इन्शुरन्स क्षेत्रात वाहन, ट्रॅव्हल, हेल्थ, घर आणि अपघात इत्यादी इन्श्युरन्स सेवा प्रदान करणे इत्यादी समाविष्ट आहे. 
फेस व्हॅल्यू : रुपये २/- प्रतिशेअर
सध्याचा भाव : रु. ७२६/- प्रतिशेअर
मार्केट कॅप : रु ५९ हजार ८०० कोटी
भाव पातळी : वार्षिक हाय रु ८१७/- आणि  लो ४७०/-
बोनस शेअर्स : १९९० साली एकदा
शेअर स्प्लिट : जून २०१९ मध्ये एकास पाच या प्रमाणात
डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
रिटर्न्स : गेल्या १० वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल पंधरा पट रिटर्न्स दिले आहेत.
भविष्यात संधी : बोनस शेअर आणि शेअर एकदा स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. भारतात कर्ज आणि इन्शुरन्स बाजारपेठ मोठी आहे आणि वाढणारी आहे. यामुळे कंपनीस उत्तम भविष्य दिसते.

सीडीएसएल    
सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी १९९७ साली स्थापन झाली. गुंतवणूकदारांना विविध सेवा देणे यात ब्रोकरमार्फत डिमॅटधारकांना अकाउंट, शेअर / इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफर, शेअर्स तारण, शेअर्स खरेदी व विक्रीची नोंद ठेवणे तसेच केवायसी सेवा यांचा समावेश आहे.
फेस व्हॅल्यू : रु १०/- प्रतिशेअर
सध्याचा भाव : रु १२०९/- प्रतिशेअर
मार्केट कॅप : रुपये १३ हजार कोटी 
भाव पातळी  : वार्षिक हाय रु. १७३४/- व लो रु. १०१५
बोनस शेअर्स : अद्याप नाही
शेअर स्प्लिट : अद्याप नाही
रिटर्न्स : जून २०१७ मध्ये लिस्ट झाल्यावर ५ वर्षांत जवळपास पाच पट रिटर्न्स.
डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
भविष्यात संधी : अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात कंपनी कार्यरत असल्याने उत्तम भविष्य. शेअर स्प्लिट आणि बोनसची संधी.

कोलगेट पामोलिव्ह इंडिया लि.
टूथ पेस्ट म्हटले की पहिले नाव मनात येते ते म्हणजे कोलगेटचे. एफएमसीजी क्षेत्रात पर्सनल केअर विभागात टूथ पेस्ट, टूथ पावडर, ब्रश, माउथ वॉश अशी विविध उत्पादने आणि त्यांची विक्री हा प्रमुख व्यवसाय कंपनी करते.
फेस व्हॅल्यू : रुपये १/-
सध्याचा भाव : रु  १५५२/-
मार्केट कॅप :  ४२ हजार कोटी रुपये
भाव पातळी : वार्षिक हाय रु १७४१/- 
आणि  लो - १३७५ /-
बोनस शेअर्स : १९८७ ते २०१५ यादरम्यान ५ वेळा
रिटर्न्स :  १० वर्षांत अडीच पट रिटर्न्स 
डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
भविष्यात संधी : शेअरचा भाव हळूहळू वाढताना दिसतो. सुरक्षित गुंतवणूक म्हणून उत्तम संधी.

C - गुंतवणुकीसाठी इतर कंपन्यांची नावे सिप्ला, क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कोल इंडिया, क्रिसिल, कोफोर्ज लि., कंटेनर कॉर्पोरेशन इंडिया, क्रॉम्प्टन ग्रिव्ह्ज आणि कमिन्स इंडिया यातील गुंतवणूकही भविष्यात उत्तम रिटर्न्स देण्याची क्षमता राखते.

टीप : हे सदर गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक असून, कंपनीच्या भविष्यातील आर्थिक कामगिरीची कोणतीही हमी देत नाही.

Web Title: Stock Marker Which company pays more money in the stock market find out companies starting from C

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.