Join us

एक डील अन् शेअर बनला रॉकेट, ₹287 वर पोहोचला भाव; असा आहे जून तिमाहीचा निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 1:54 PM

शेअरमध्ये ही तेजी एका घोषणेनंतर आली. कंपनीने हैदराबादमध्ये विजेसंदर्भातील एका नव्य कराराची घोषणा केली आहे...

एनएलसी इंडियाचा शेअर आज गुरुवारी फोकसमध्ये आहेत. बीएसईवर इंट्राडे 4.2 टक्क्यांच्या वाढीसह हा शेअर 287.95 रुपयांवर व्यवहार करत होता. शेअरमध्ये ही तेजी एका घोषणेनंतर आली. कंपनीने हैदराबादमध्ये विजेसंदर्भातील एका नव्य कराराची घोषणा केली आहे. तेलंगणा राज्य डिस्कॉमसोबतचा हा करार CPSU योजनेअंतर्गत 200 मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आहे. जो 25 वर्ष चालेल.

असा आहे करार -या सोलर योजनेमुळे जवळपास 1,300 कोटी युनिट हरित ऊर्जा उत्पन्न होण्याचा आणि त्याच्या लाइफमध्ये कार्बन उत्सर्जनात 90 लाख टनांची घट होण्याचा अंदाज आहे. हा प्रकल्प जून 2025 पर्यंत कार्यान्वित होईल. 

कंपनीचा शेअर गेल्या पाच दिवसांत 3%, तर गेल्या सहा महिन्यांत 25% पर्यंत वधारला आहे. या शेअरची किंमत एका वर्षात 115% ने वाढली आहे. हा स्टॉक पाच वर्षांत 415% वर पोहोचला आहे.

जून तिमाहीचे निकाल - एनएलसी इंडिया लिमिटेडचा चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतील एकूण शुद्ध नफा यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या समान कालावधीतील 413.57 कोटी रुपयांच्या तुलनेत 37.02 टक्क्यांनी वाढून 566.69 कोटी रुपये राहिला. 30 जून, 2024 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी समूहाचे एकूण उत्पन्न 6.19 टक्क्यांनी वाढून 3,640.60 कोटी रुपये झाले. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत हे 3,428.48 कोटी रुपये होते. 

कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाही दरम्यान लिग्नाइट उत्पादनात 22.17 टक्क्यांची वृद्धि नोंदवली आहे. अर्थात आर्तिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत 50.48 एलटीच्या तुलनेत 61.67 एलटीची वाढ झाली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकपैसा