Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market: शेअर बाजारात नव्याने एन्ट्री? मग या गोष्टी माहीत करून घ्याच...

Stock Market: शेअर बाजारात नव्याने एन्ट्री? मग या गोष्टी माहीत करून घ्याच...

Stock Market: शेअर बाजाराची भुरळ तरुणांना सध्या आकर्षित करीत आहे. गेल्या दोन वर्षांंत अनेकांनी नव्याने बाजारात एन्ट्री केली आहे. बरेच येत आहेत आणि येत राहतील. बाजारात येताना गुंतवणूकदार प्रामुख्याने तीन प्रकारांचे असतात - ट्रेडर्स / पोझिशनल ट्रेडर/लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर्स.

By पुष्कर कुलकर्णी | Published: August 29, 2022 11:16 AM2022-08-29T11:16:28+5:302022-08-29T11:16:54+5:30

Stock Market: शेअर बाजाराची भुरळ तरुणांना सध्या आकर्षित करीत आहे. गेल्या दोन वर्षांंत अनेकांनी नव्याने बाजारात एन्ट्री केली आहे. बरेच येत आहेत आणि येत राहतील. बाजारात येताना गुंतवणूकदार प्रामुख्याने तीन प्रकारांचे असतात - ट्रेडर्स / पोझिशनल ट्रेडर/लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर्स.

Stock Market: A new entry in the stock market? Then know these things... | Stock Market: शेअर बाजारात नव्याने एन्ट्री? मग या गोष्टी माहीत करून घ्याच...

Stock Market: शेअर बाजारात नव्याने एन्ट्री? मग या गोष्टी माहीत करून घ्याच...

- पुष्कर कुलकर्णी  

शेअर बाजाराची भुरळ तरुणांना सध्या आकर्षित करीत आहे. गेल्या दोन वर्षांंत अनेकांनी नव्याने बाजारात एन्ट्री केली आहे. बरेच येत आहेत आणि येत राहतील. बाजारात येताना गुंतवणूकदार प्रामुख्याने तीन प्रकारांचे असतात - ट्रेडर्स / पोझिशनल ट्रेडर/लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर्स.

ट्रेडर्स 
या प्रकारात इंट्रा डे आणि ऑप्शन्स हे ट्रेड करून पैसे कामविता येतो. यात रिस्क अधिक असते. इंट्रा डेमध्ये रोजची ट्रेड पोझिशन बाजार बंद होते वेळी क्लोज करावी लागते. खरेदी असल्यास विक्री तसेच विक्री केली असल्यास खरेदी करून ट्रेड क्लोज करावा लागतो. ऑप्शन ट्रेडमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी यात प्रत्येक आठवड्याचा ऑप्शन प्रत्येक गुरुवारी, तर इक्विटीमध्ये महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी ऑप्शन्सची पोझिशन क्लोज करावी लागते.

फायदे
१. पैसे जास्त वेळ गुंतून राहत नाहीत
२. अभ्यासपूर्ण ट्रेडिंग केल्यास भांडवल गुंतून न राहता फायदा बाजूला काढता येतो.

तोटे 
१. ट्रेड पोझिशन चुकल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता
२. बाजारातील चढ-उताराचा मानसिक स्थितीवर नकारात्मक परिणाम
३. अशा प्रकारातील ट्रेडिंगचा अभ्यास नसल्यास अंधारात तीर मारला असेच होते आणि झाला तर फायदा नाही तर जबर नुकसान हे निश्चित असते.

पोझिशन  ट्रेडर्स 
आज शेअर खरेदी केले आणि भाव वाढल्यावर विकले अशा ट्रेडला पोझिशन ट्रेड म्हणतात. या ट्रेडमध्ये गुंतवणुकीचा कालावधी काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत असू शकतो.

पोझिशनल ट्रेडर्सनी काेणती काळजी घ्यावी? 
१. खरेदी करताना भाव पातळी योग्य आहे का, हे आवर्जून तपासावे. यासाठी टेक्निकल टूलचा वापर करावा. 
२. MACD आणि RSI या टूलमुळे शेअर ओव्हर बॉट / ओव्हर सोल्ड किव्वा नेमका कोणत्या पातळीवर आहे ते समजते. 
३. RSI जेव्हा ओव्हर सोल्डपासून वरच्या पातळीवर जात असतो तेव्हा खरेदीची उत्तम वेळ असते. 
४. तसेच MACD ट्रेंड लाइन मुव्हिंग लाइनला छेदून वरच्या दिशेला जाते तेव्हा खरेदीचा सिग्नल असतो.

फायदे

१. गुंतवणुकीची रक्कम कमी कालावधीसाठी बांधली जाते.
२. योग्य वेळी एन्ट्री कमी कालावधीत जास्त नफा मिळवून देते.
३. नुकसानीची शक्यता अगदी कमी असते.

लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर 
या प्रकारातील गुंतवणूकदार दीर्घ काळाचा विचार करतात. केलेली गुंतवणूक १०/१५/२० वर्षे ठेवतात. बाजारातील दिग्गज राधाकृष्ण दमाणी आणि राकेश झुनझुनवाला या प्रकारात मोडतात.

लॉन्ग टर्ममध्ये नेमकी कोणती काळजी घ्यावी? 
१. शेअरची योग्य निवड करणे आवश्यक.
२. ज्या व्यवसायास उत्तम भविष्य आहे अशा कंपन्यांचे शेअर्स निवडा.
३. बाजारातील चढ-उताराचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. आपले उद्दिष्ट कायम नजरेसमोर ठेवा.
४. कंपनी फंडामेंटल्स वर वर्षातून दोनदा लक्ष द्या. यामुळे गुंतवणूक कायम ठेवावी का काढून घ्यावी यावर निर्णय घेणे सुकर होते.

फायदे
१. गुंतवणूक अनेक पटींनी वाढते.
२. रिटायरमेंटची योग्य तजवीज होते.
३. विशिष्ट मोठी आर्थिक उद्दिष्ट्ये सफल करता येतात.
४. बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटमुळे मालमत्ता वाढते.
५. डिव्हीडंडच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळते.

 

Web Title: Stock Market: A new entry in the stock market? Then know these things...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.