Join us  

Stock Market: मंगळवारच्या तेजीनंतर शेअर बाजाराची आज घसरणीसह सुरुवात, Sensex ३०० अंकांनी आपटला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 9:57 AM

Stock Market: शेअर बाजारात बुधवारी काही प्रमाणात घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली आणि निफ्टी ९५ अंकांच्या घसरणीनंतर २४३७१ च्या पातळीवर उघडला.

Stock Market: शेअर बाजारात बुधवारी काही प्रमाणात घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली आणि निफ्टी ९५ अंकांच्या घसरणीनंतर २४३७१ च्या पातळीवर उघडला, तर सेन्सेक्स ११४ अंकांनी घसरून ८०२५६ च्या पातळीवर उघडला. यानंतर कामकाजादरम्यान त्यात ३०० अंकांची घसरण होऊन तो ८०,०७० अंकांच्या जवळास व्यवहार करत होता.

सुरुवातीच्या व्यवहारात मारुती सुझुकी, बीईएल, बजाज ऑटो, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स या सारख्या शेअर्समध्ये निफ्टी ५० पॅकमध्ये खरेदी दिसून येत आहे, तर निफ्टी ५० निर्देशांकातील सिप्ला, डॉक्टर रेडीज, सन फार्मा, श्रीराम फायनान्स, सबबी लाइफ या शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून येतोय.

ऑटो आणि एफएमसीजी सेक्टरमध्ये खरेदी, तर फार्मा, आयटी आणि मेटल सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव दिसून येत आहे. २६,२७७ च्या उच्चांकी पातळीवरून ८ टक्क्यांनी घसरलेल्या निफ्टीमध्ये दिवाळीपूर्वी आणखी काही घसरण पाहायला मिळत आहे. पुढील आठवडय़ात होणाऱ्या अमेरिकी निवडणुकांबाबत अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर बाजार रेंज बाऊंड राहण्याची शक्यता आहे. 

अमेरिकी बाजारात संमिश्र कल

नॅसडॅक मंगळवारी विक्रमी उच्चांकी पातळीवर बंद झाला आणि मंगळवारी एस अँड पी ५०० मध्ये वाढ झाली, तर दुसरीकडे डाऊमध्ये मात्र घसरण दिसून आली. 

टॅग्स :शेअर बाजार