Join us

₹8 वरून ₹81 वर पोहचला हा शेअर, 1 लाखाचे केले ₹10.20 लाख; गुंतवणूकदारांना केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 20:41 IST

गेल्या वर्षात 11 नोव्हेंबरला या शेअरने 52-आठवड्यांचा उच्चांक ₹162.95 गाठला होता. तर या वर्षात 7 एप्रिलला तो 52-आठवड्यांचा  ₹59.93 या निचांकी पातळीवर होता...

शेअर बाजारातगुंतवणूक करण्याचा एक चांगला नियम म्हणजे, वाजवी दरात शेअर खरेदी करणे आणि तो आपल्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घकाळ ठेवणे. असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. थोडक्यात काय तर, शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये सय्यम असणे अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही आपल्याला अशाच एका पेनी स्टॉक संदर्भात माहिती देणार आहोत. ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. हा शेअर आहे अल्फा ट्रान्सफॉर्मर्सचा.

₹8.01 वरून ₹81.73 रुपयांवर पोहोचला शेअर -अल्फा ट्रान्सफॉर्मर्सचा (Alfa Transformers) शेअर केवळ तीन वर्षांत ₹8.01 वरून 81.73 रुपयांवर पोहोचला होता. अर्थात एखाद्या व्यक्तीने 11 एप्रिल, 2022 रोजी अल्फा ट्रान्सफॉर्मर्सच्या शेअरमध्ये ₹8.01 रुपयांच्या दराने गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर 11 एप्रिल 2025 रोजी ही गुंतवणूक 920 टक्क्यांनी वाढली असती. 

गेल्या महिन्यात अल्फा ट्रान्सफॉर्मर्सच्या शेअरच्या किंमत 20 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, गेल्या वर्षाच्या शेअर प्राइसचा विचार करता, हा शेअर सध्या 9 टक्क्यांनी खाली आहे. गेल्या तीन वर्षांत या शेअरमध्ये 920 टक्क्यांची तेजी आहे. गेल्या वर्षात 11 नोव्हेंबरला या शेअरने 52-आठवड्यांचा उच्चांक ₹162.95 गाठला होता. तर या वर्षात 7 एप्रिलला तो 52-आठवड्यांचा  ₹59.93 या निचांकी पातळीवर होता. 

गुंतवणूकदारांना मिळाला बंपर परतावा -जर गेल्या तीन वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये ₹1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आता त्याचे ₹10.20 लाख झाले असते. हा शेअर शुक्रवारी 10 टक्क्यांनी वाधारून ₹81.73 वर बंद झाल. अल्फा ट्रान्सफॉर्मर्सच्या शेअर्सचे सध्याचे मार्केट कॅप ₹74.79 कोटी एवढे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारशेअर बाजार