Join us

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी पाण्यात; 'या' १० शेअर्सना सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 3:57 PM

Stock Market : सातत्याने विक्री होत असलेले बाजार बुधवारीही मोठ्या घसरणीसह बंद झाले. बाजारातील घसरणीचा हा सलग ५वा दिवस आहे.

Stock Market : भारतीय शेअर बाजारात मंदीचा काळ सुरू होताना दिसत आहे. सातत्याने विक्री होत असलेले बाजार बुधवारीही मोठ्या घसरणीसह बंद झाले. बाजारातील घसरणीचा हा सलग ५वा दिवस आहे. निफ्टी साडेचार महिन्यांतील नीचांकी पातळीवर गेला आहे. बंद होताना निफ्टी ३२४ अंकांनी घसरून २३,५५९ वर बंद झाला. तर सेन्सेक्स ९८४ अंकांनी घसरून ७७,६९० वर बंद झाला आणि निफ्टी बँक १०६९ अंकांनी घसरून ५०,०८८ वर बंद झाला.

सेन्सेक्स चार्टमध्ये मोठी घसरणआठवड्याच्या तिसऱ्या दिवशी सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी २६ कंपन्यांचे शेअर्स नुकसानासह लाल रंगात बंद झाले तर केवळ ४ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले. दुसरीकडे, निफ्टी ५० मधील ५० पैकी ४४ कंपन्यांचे शेअर्सही घसरणीसह लाल रंगात बंद झाले. केवळ ६ कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले. याचा सरळ अर्थ असा की आज पुन्हा एकदा बहुतांश कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे.

महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये मोठी घसरणसेन्सेक्स कंपन्यांमध्ये महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये आज सर्वाधिक ३.२३ टक्क्यांची घसरण झाली. टाटा स्टील ३.०२ टक्के, अदानी पोर्ट्स २.८२ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील २.१८ टक्के, इंडसइंड बँक १.८९ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज १.७३ टक्के, एचडीएफसी बँक १.६७ टक्के, कोटक महिंद्रा बँक १.६७ टक्के, भारतीय स्टेट बँक १.६३ टक्के, बजाज फिनसर्व १.५८ टक्के, एक्सिस बँक १.३५ टक्के, लार्सन एंड टुब्रो १.२७ टक्के, पावरग्रिड १.१८ टक्के, सनफार्मा १.१६ टक्के आणि टीसीएस १.१३ टक्के घसरुन बंद झाले.

या ४ कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात बंदयाशिवाय आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, टायटन, एचसीएल टेक, भारती एअरटेल, आयटीसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअर्समध्येही घसरण झाली. तर, टाटा मोटर्सचे शेअर्स ०.२९ टक्के, एनटीपीसीचे ०.२१ टक्के, एशियन पेंट्सचे ०.१६ टक्के आणि इन्फोसिसचे शेअर्स ०.०१ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक