Share Market Update: कमकुवत जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार बुधवारी किरकोळ तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 137.50 अंकांनी वधारला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक जवळपास 0.52 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्यामुळे शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे 62,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, युटिलिटी, पॉवर, रियल्टी आणि आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. दुसरीकडे मेटल, टेलिकॉम आणि फायनान्शिअल इंडेक्सचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले.
व्यवहाराच्या अखेरच्या सत्रात बीएसईमधील (BSE) 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 137.50 अंकांनी किंवा 0.21 टक्क्यांनी वाढून 65,539.42 वर बंद झाला. त्याच वेळी, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 30.45 अंकांनी किंवा 0.16 टक्क्यांनी वाढून 19,465 वर बंद झाला.
गुंतवणूकदारांनी कमावले ६२ हजार कोटीबीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप बुधवारी वाढून 304.36 लाख कोटी रुपयांच्या पार गेलं. यापूर्वी सोमवारी ते 303.74 लाख रुपये होतं. या प्रकारे बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ६२ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांनी एका दिवसांत ६२ हजार कोटी रुपये कमावलेत.
या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ सेन्सेक्समधील 30 पैकी 13 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यातही अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स सर्वाधिक 2.44 टक्क्यांनी वाढले. याशिवाय एनटीपीसी (NTPC), टाटा मोटर्स (Tata Motors), इन्फोसिस आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या (M&M) शेअर्समध्ये आज तेजी दिसून आली. हे शेअर्स आज 1.55 टक्के ते 2.04 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरणदुसरीकडे, सेन्सेक्समधील उर्वरित 17 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.90 टक्क्यांची घसरण झाली. यानंतर, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक आणि बजाज फायनान्सचे शेअर्स सर्वाधिक घसरले.