Share Market closing bell : शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांसाठी शुक्रवारचा दिवस 'फॅन्टॅस्टिक फ्रायडे' ठरला. आज सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन विक्रमी उच्चांक गाठला. सेन्सेक्स 1245 अंकांच्या वाढीसह 73745 च्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी 22339 अंकास सर्वकालीन उच्चांकावर गेले बंद झाला. यूएस बाजारातील चांगल्या कामगिरीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने दमदार वाढ नोंदवली.
बँकिंग, फिनसर्व्हिसेस, मेटल, ऑटो निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली, तर फार्मा आणि आयटी निर्देशांकांत घट पाहायला मिळाली. टाटा स्टीलमध्ये आज जोरदार वाढ झाली आणि हा शेअर 6.50 टक्क्यांनी वाढला, तर एल अँड टी 4.33 टक्क्यांनी वाढून निफ्टी 50 टॉप गेनर्सच्या यादीत राहिला. याशिवाय जेएसडब्ल्यू स्टील, टायटनचे शेअर्सही 4 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. आजच्या चढत्या तेजीत ऑटो शेअर्स, मेटल शेअर्स आणि पीएसयू बँकांनी मोठा हातभार लावला. तर, आज फार्मा आणि आयटी शेअर्स सर्वाधिक घसरले.