Share Market : या आठवड्याच्या सुरुवातीपासून भारतीय शेअरबाजार हेलकावे खात आहे. शेअर बाजारात चढ-उतारांची मालिका सुरूच आहे. गुरुवारीही शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून आली. मात्र, शेवटी बाजार किंचित वाढीसह हिरव्या रंगात बंद झाला. आज बीएसई सेन्सेक्स १४४.३१ अंकांच्या वाढीसह ८१,६११.४१ अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे, एनएसई निफ्टी ५० देखील १६.५० अंकांच्या वाढीसह २४,९९८.४५ अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्स ८२,००२ वरून ८१,६११ अंकांवर आलाआज एकवेळ सेन्सेक्स ८२,००२.८४ अंकांच्या पातळीवर पोहोचला होता. तर निफ्टी २५,१३४.०५ अंकांच्या पातळीवर पोहोचला होता. पण यानंतर बाजारात अनेक मधूनमधून चढ-उतार आले आणि शेवटी बाजार अगदी किरकोळ वाढीसह बंद झाला. गुरुवारी सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी १६ कंपन्यांचे समभाग हिरव्या चिन्हात आणि १४ कंपन्यांचे समभाग लाल चिन्हात बंद झाले. त्याचप्रमाणे निफ्टी ५० मधील ५० पैकी २३ कंपन्यांचे समभाग हिरव्या चिन्हात तर २७ कंपन्यांचे समभाग लाल चिन्हात बंद झाले.
कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये तेजीआज कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स सेन्सेक्ससाठी सर्वाधिक ४.१६ टक्के वाढीसह बंद झाले. याशिवाय जेएसडब्ल्यू स्टील १.८२ टक्के, एचडीएफसी बँक १.७५ टक्के, इंडसइंड बँक १.४३ टक्के, पॉवरग्रीड १.३९ टक्के, मारुती सुझुकी १.३४ टक्के, ॲक्सिस बँक १.२० टक्के, एनटीपीसी १.०९ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर अल्ट्राटेक सिमेंट, अदानी पोर्ट्स बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, बजाज फायनान्स, आयटीसी आणि एचसीएल टेक यांचे शेअर्सही हिरव्या रंगात बंद झाले.
टेक महिंद्राचे मोठे नुकसानटेक महिंद्राच्या शेअर्समध्ये आज सर्वात मोठी २.८२ टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय सन फार्माचे शेअर्स १.९० टक्के, इन्फोसिस १.७८ टक्के, टाटा मोटर्स १.१० टक्के, टायटन १.०० टक्के, लार्सन अँड टुब्रो ०.७४ टक्के, टीसीएस ०.५६ टक्के घसरून बंद झाले. हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल आणि स्टेट बँक यांचे शेअर्स घसरुन बंद झाले.