शेअर बाजार सोमवारी तेजीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स २५०७ अंकांनी वधारून ७६४७० अंकांवर तर निफ्टी ७३३ अंकांच्या वाढीसह २३२६४ अंकांवर बंद झाला. सोमवारी निफ्टीच्या सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी चांगली वाढ नोंदवली. मिडकॅप १०० तीन टक्के, स्मॉलकॅप दोन टक्के, बँक निर्देशांक ४.३ टक्के, निफ्टी ऑटो २.५८ टक्के, निफ्टी एफएमसीजी एक टक्क्यांहून अधिक आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस ४.२९ टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले.
शेअर बाजारात अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, एसबीआय, पॉवर ग्रिड, ओएनजीसी, अदानी एंटरप्रायझेस आणि श्रीराम फायनान्सचे शेअर्स सर्वाधिक वधारले, तर आयशर मोटर्स, एलटीआय माइंडट्री, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, सन फार्मा ब्रिटानिया आणि डॉक्टर रेड्डीज यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले.
शेअर बाजारात सोमवारी बंपर तेजी नोंदविण्यात आली आहे. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीने नवा उच्चांक गाठला. मात्र, अशा वेळी शेअर्समधून नफा वसूली करण्याची गरज नसल्याचं शेअर बाजारातील अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. शेअर बाजारातील बंपर तेजीच्या काळात बँक निफ्टी ४.२६ टक्क्यांनी वधारला असून ५१००० ची पातळी ओलांडली. सोमवारी शेअर बाजाराच्या कामकाजात पीएसयू शेअर्स रॉकेट बनले आहेत.
पीएसयू शेअर्स रॉकेट
सोमवारी कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बीईएमएल लिमिटेड, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, रेल विकास निगम, इरकॉन, टिटागड, टॅक्समेको रेल, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, राइट्स लिमिटेड, गार्डन रीच शिपबिल्डर, कोचीन शिपयार्ड, आयआरसीटीसी, भारत डायनॅमिक्स आणि माझगाव डॉक यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली.
मल्टीबॅगर स्टॉक्सची स्थिती
सोमवारच्या व्यवहारात फिनोलेक्स इंडस्ट्रीज, लार्सन, ओएनजीसी, इरकॉन, अशोक लेलँड, प्राज इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, विप्रो, टीसीएस या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. सोमवारच्या बंपर तेजीमध्येही इन्फोसिस, एशियन पेंट्स आणि एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. गौतम अदानी समूहाच्या १० कंपन्यांच्या समभागांमध्ये सोमवारी बंपर वाढ नोंदविण्यात आली आहे. अदानी पॉवर १५ टक्क्यांहून अधिक, तर अदानी पोर्ट्स १० टक्क्यांनी वधारले. अदानी एनर्जी सोल्युशन ९ टक्क्यांनी वधारला तर अदानी टोटल गॅस ७.४ टक्क्यांनी वधारला.