Lokmat Money >शेअर बाजार > ४८७ अंकांच्या उसळीसह विक्रमी पातळीवर बंद झाला शेअर बाजार; या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

४८७ अंकांच्या उसळीसह विक्रमी पातळीवर बंद झाला शेअर बाजार; या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Closing Bell Today : शेअर बाजार आज विक्रमी पातळीवर बंद झाला आहे. पाहूया कोणत्या शेअर्सनं केली कमाई.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 05:03 PM2023-07-03T17:03:14+5:302023-07-03T17:03:53+5:30

Closing Bell Today : शेअर बाजार आज विक्रमी पातळीवर बंद झाला आहे. पाहूया कोणत्या शेअर्सनं केली कमाई.

Stock market closes at record high with a jump of 487 points The highest growth in these shares closed over 65000 mark | ४८७ अंकांच्या उसळीसह विक्रमी पातळीवर बंद झाला शेअर बाजार; या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

४८७ अंकांच्या उसळीसह विक्रमी पातळीवर बंद झाला शेअर बाजार; या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Closing Bell Today : मेटल, ऑईल आणि गॅस सेक्टरमधील शेअर्सच्या खरेदीमुळे देशांतर्गत शेअर बाजार सोमवारी वाढीसह बंद झाला. BSE सेन्सेक्स 486.49 अंकांच्या म्हणजेच 0.75 टक्क्यांच्या वाढीसह 65,205.05 अंकांच्या पातळीवर बंद झाला. दरम्यान, पहिल्यांदाच सेन्सेक्स 65000 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे, NSE निफ्टी 133.50 अंकांच्या म्हणजेच 0.7 टक्क्यांच्या वाढीसह 19,322.55 अंकांच्या पातळीवर बंद झाला. ग्रासिम इंडस्ट्रीजचे शेअर निफ्टीवर सर्वाधिक 3.48 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

जर आपण सेक्टर्सबद्द बोललो तर, मेटल, ऑइल अँड गॅस, एफएमसीजी आणि पीएसयू बँक निर्देशांक 1-3 टक्क्यांच्या उसळीसह बंद झाले. त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञान, फार्मा निर्देशांकही 0.5-1 टक्क्यांनी घसरून बंद झाले. BSE मिडकॅप निर्देशांक 0.3 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

रोज नवा रेकॉर्ड
शेअर बाजारात रोज नवा रेकॉर्ड होत आहे. बीएसई सेन्सेक्सनं आज पहिल्यांदा 65 हजार अकांची पातळी पार केली. कामकाजादरम्यान शेअर बाजाराचा निर्देशांक 65300.35 अंकांवर पोहोचला होता. तर निफ्टीनं 19345.10 अंकांच्या उच्चांकी स्तरापर्यंत पोहोचला होता.

यात सर्वाधिक वाढ
बीएसई सेन्सेक्सवर आज रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, बजाज फायनॅन्स, एसबीआय, एचडीएफसी, अल्ट्राटेक सीमेंट, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, विप्रो आणि इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली.

यात झाली घसरण
तर दुसरीकडे पॉवरग्रीड, सन फार्मा, मारुती, लार्सन अँड टुब्रो, टेक महिंद्रा, टीसीएस, नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, अॅक्सिस बँक, टायटन आणि भारती एअरटेलच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.

Web Title: Stock market closes at record high with a jump of 487 points The highest growth in these shares closed over 65000 mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.