Stock Market Closing Bell:शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यासांठी आजचा दिवस(दि.19) चांगला ठरला. सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर आज BSE सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद झाले. बाजारातील या तेजीमुळे BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 4.07 लाख कोटी रुपयांनी वाढले. म्हणजेच, गुंतवणूकदारांनी एका दिवसांत 4 लाख कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.
आज सेन्सेक्स 496.37 अंकांच्या किंवा 0.70 टक्क्यांच्या वाढीसह 71683.23 वर बंद झाला, तर निफ्टी 160.15 अंकांच्या किंवा 0.75 टक्क्यांच्या वाढीसह 21622.40 वर बंद झाला. निफ्टीचे बहुतांश निर्देशांक ग्रीन झोनमध्ये बंद झाले, मात्र निफ्टी बँक 0.03 टक्क्यांनी घसरला.
गुंतवणूकदारांची 4.07 लाख कोटींची कमाईबाजारातील या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या भांडवलात लक्षणीय वाढ झाली आहे. 18 जानेवारी 2024 रोजी BSE वर सूचीबद्ध सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 369.50 लाख कोटी रुपये होते. आज, 19 जानेवारी 2024 रोजी ते वाढून 373.56 लाख कोटी रुपये झाली आहे. याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात 4.07 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी तीन दिवसांच्या घसरणीत गुंतवणूकदारांचे 6.6 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
आज सर्वात जास्त फायदा भारती एअरटेल, एनटीपीसी आणि टेक महिंद्राला झाला. तर, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक आणि कोटक बँकेत सर्वात मोठी घसरण झाली.
(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)