Join us  

आठवड्याचा शेवट गोड; सेंसेक्स-निफ्टीमध्ये जबरदस्त वाढ, गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 4:20 PM

Closing Bell Today: BSE सेन्सेक्स 493 अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 134 अंकांनी वाढला.

Closing Bell Today- शेअर बाजारासाठी शुक्रवारचा दिवस अतिशय चांगला राहिला. आठवड्याचा शेवट बंपर तेजीसह झाला. BSE सेन्सेक्स 493 अंकांच्या वाढीसह 67481 च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 134 अंकांपेक्षा जास्त वाढीसह 20,268 च्या पातळीवर बंद झाला. दरम्यान, शुक्रवारी शेअर बाजाराच्या कामकाजात बरेच चढ-उतारही पाहायला मिळाले. 

गुरुवारी NSE निफ्टी 20133 च्या स्तरावर बंद झाला होता, जो शुक्रवारी 20194 च्या स्तरावर उघडला आणि दिवसभराच्या व्यवहारात 20281 च्या पातळीवरही गेला. बीएसई सेन्सेक्सच्या टॉप गेनर्सबद्दल बोलायचे तर यामध्ये टीव्ही18 ब्रॉडकास्ट, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, एमटीएनएल, डिक्सन टेक्नॉलॉजीचे शेअर्स होते. व्हर्लपूल, ओरिएंट सिमेंट आणि अशोक लेलँड या कंपन्यांच्या शेअर्सनी खराब कामगिरी केली.

शुक्रवारी निफ्टी मिडकॅप 100 ने शेअर बाजारात एक टक्का वाढ नोंदवली तर बीएसई स्मॉल कॅप अर्ध्या टक्‍क्‍यांच्या वाढीसह बंद झाले. निफ्टी आयटी, निफ्टी बँकसह अनेक निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. निफ्टी ऑटो कमजोर राहिला तर निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस सारख्या निर्देशांकातही वाढ झाली.

शुक्रवारच्या तेजीत मल्टीबॅगर परतावा देणार्‍या शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर, एक्साइड इंडस्ट्रीज, पटेल इंजिनीअरिंग, स्टोव्ह क्राफ्ट, युनि पार्ट्स इंडिया आणि देवयानी इंटरनॅशनलच्या शेअर्सनी वाढ नोंदवली तर गती लिमिटेड, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा. कामधेनू लिमिटेड, जिओ फायनान्शियल आणि ओम इन्फ्रा यांच्या शेअर्स घसरले.

शुक्रवारी गौतम अदानी समूहाच्या नऊ सूचीबद्ध कंपन्यांपैकी चार कंपन्यांचे शेअर्स लाल तर पाच शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत होते. अदानी विल्मरच्या शेअरमध्ये किंचित वाढ झाली तर अदानी पॉवर सुमारे दोन टक्क्यांच्या वाढीसह 440 रुपयांवर व्यवहार करत होता. अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, फेडरल बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एसबीआय कार्डच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर मारुती सुझुकी, आयआरसीटीसी, पतंजली फूड्स, मुथूट या कंपन्यांचे शेअर घसरले. 

(टीप- आम्ही फक्त शेअरच्या कामगिरीविषयी माहिती दिली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक