Join us  

सेन्सेक्सने ६६ हजारांचा टप्पा ओलांडला, शेअर बाजार दुसऱ्या दिवशीही नफ्यासह बंद झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 4:44 PM

आज बुधवारीही शेअर बाजारात तेजी दिसून आली.

मंगळवार सारखी आज बुधवारीही शेअर बाजारात तेजी दिसून आली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज  २९ अंकांच्या वाढीसह १९८११ च्या पातळीवर बंद झाला, तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ९२ अंकांच्या वाढीसह ६६०३३.६७ च्या पातळीवर बंद झाला. बुधवारी दिवसभर शेअर बाजाराच्या व्यवहारात चढ-उतार पाहायला मिळाले. बुधवारी शेअर बाजारात बीपीसीएल, सिप्ला, एनटीपीसी आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स सर्वाधिक वाढले, तर इंडसइंड बँक, हिंदाल्को, कोटक बँक आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स सर्वाधिक तोट्यात होते. निफ्टी मिडकॅप १००  थोड्या वाढीसह बंद झाला तर बीएसई स्मॉल कॅप किंचित कमजोरीसह बंद झाला. निफ्टी आयटी निर्देशांक ०.७२ टक्क्यांनी वाढला तर निफ्टी बँक ०.५२ टक्क्यांवर बंद झाला.

स्विगी-झोमॅटोला 500-500 कोटी रुपयांची नोटीस, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

बुधवारच्या व्यवहारात अदानी समुहाच्या सर्व ९ लिस्टेड कंपन्यांच्या शेअरमध्ये कमजोरी नोंदवण्यात आली. अदानी एंटरप्रायझेस एक टक्के कमीने बंद झाले तर अदानी विल्मार लिमिटेडचे शेअर दोन टक्क्यांनी कमी झाले. शेअर बाजारात मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचे झाले तर फक्त ओम इन्फ्राचे शेअर्स दोन टक्क्यांनी वाढले तर जिओ फायनान्शियल, टाटा मोटर्स, कामधेनू लिमिटेड, गती लिमिटेड, युनी पार्ट्स इंडिया, एक्साइड इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, देवयानी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खाली होते. इंटरनॅशनल, स्टोव्ह क्राफ्ट आणि पटेल इंजिनिअरिंगच्या शेअर्समध्ये कमीची नोंद झाली आहे.

बुधवारी शेअर बाजाराच्या आयटी पॅकमध्ये वाढ झाली आणि इन्फोसिसचे शेअर्स १.३१ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. बुधवारी अॅक्सिस बँक, मुथूट फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज फायनान्सच्या समभागांनीही किंचित वाढ नोंदवली, तर आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक, एसबीआय कार्ड, फेडरल बँक, आयआरसीटीसी, पतंजली फूड्स आणि आशानिषा इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये  कमजोरी नोंदवली. 

बुधवारी दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीने चांगली वाढ नोंदवली होती, पण अखेरीस सेन्सेक्स आणि निफ्टीने आपले सर्व फायदे गमावले आहेत. PSU बँक निर्देशांक हा शेअर बाजारातील सर्वात कमकुवत कामगिरी करणाऱ्या निर्देशांकांपैकी एक होता. शेअर बाजारातील चार-पाच आयपीओपैकी टाटा टेकचा आयपीओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायटाटा