Join us

शेअर बाजार पुन्हा कोसळला; सेन्सेक्स 379 तर निफ्टी 136 अंकांनी घसरले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 16:52 IST

Stock Market Closing Highlights: आज सकाळीही शेअर बाजाराची सपाट सुरुवात झाली.

Stock Market Closing Highlights: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवाढीच्या पार्श्वभूमीवर आज (9 एप्रिल) पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात कोसळला. आजच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 379.93 अंकांनी घसरुन 73,847.15 वर आले, तर निफ्टी 136.70 अंकांनी घसरुन 22,399.15 वर आले. रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात 0.25 टक्के कपात करण्याचा निर्णयही गुंतवणूकदारांचे मनोबल वाढविण्यात अपयशी ठरला. 

जागतिक स्तरावर टॅरिफवरुन वाढत्या तणावामुळे आणि जीडीपी वाढीमध्ये घट होण्याच्या अंदाजामुळे गुंतवणूकदार सावध असल्याचे दिसून आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ घोषणा आज (9 एप्रिल) पासून लागू झाली आहे. यामुळे आयटी, मेटल आणि ऑटो क्षेत्रात सर्वात मोठी घसरण दिसून आली. मंगळवारी सुरुवातीला बाजारात मोठी तेजी दिसून आली, परंतु आज गुंतवणूकदारांचा मूड पूर्णपणे सावध राहिला.

सकाळी बाजाराची सपाट सुरुवात आज सकाळी शेअर बाजाराची सपाट सुरुवात झाली. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी आयटी आणि फार्मा क्षेत्रातील समभागांमध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली. निफ्टीमध्ये विप्रो, एसबीआय, टेक महिंद्रा, एल अँड टी, ट्रेंट यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले, तर नेस्ले, एचयूएल, टाटा कंझ्युमर, टायटन कंपनी आणि पॉवर ग्रिड कॉर्प हे आज सर्वाधिक तेजीत होते. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.8 टक्क्यांनी घसरून बंद झाला, तर स्मॉलकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरला. ऑटो (0.3 टक्के वाढ) आणि एफएमसीजी (1.5 टक्के वाढ) वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक