Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजारात तेजी; एकूण मार्केट कॅप 408.54 लाख कोटींच्या विक्रमी उच्चांकावर

शेअर बाजारात तेजी; एकूण मार्केट कॅप 408.54 लाख कोटींच्या विक्रमी उच्चांकावर

आजच्या सत्रात सेन्सेक्स 128 अंकांच्या वाढीसह 74611 आणि निफ्टी 44 अंकांच्या वाढीसह 22,649 अंकांवर बंद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 04:46 PM2024-05-02T16:46:18+5:302024-05-02T16:46:43+5:30

आजच्या सत्रात सेन्सेक्स 128 अंकांच्या वाढीसह 74611 आणि निफ्टी 44 अंकांच्या वाढीसह 22,649 अंकांवर बंद झाला.

Stock Market Closing On 2 May 2024: Stock market boom; Total market cap at a record high of Rs 408.54 lakh crore | शेअर बाजारात तेजी; एकूण मार्केट कॅप 408.54 लाख कोटींच्या विक्रमी उच्चांकावर

शेअर बाजारात तेजी; एकूण मार्केट कॅप 408.54 लाख कोटींच्या विक्रमी उच्चांकावर

Stock Market Closing On 2 May 2024: गुरुवारी(दि.2) शेअर बाजार तेजीसह बंद झाला. ऑटो आणि एनर्जी शेअर्समधील खरेदीमुळे बाजारात जोरदार वाढ दिसून आली आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात मिडकॅप शेअर्समध्येही खरेदी पाहायला मिळाली. बाजार बंद होताना बीएसई सेन्सेक्स 128 अंकांच्या वाढीसह 74,611 अंकांवर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 44 अंकांच्या उसळीसह 22,649 अंकांवर बंद झाला.

मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर
भारतीय शेअर बाजारातील या तेजीमुळे बाजार भांडवलाने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 408.54 लाख कोटी रुपयांवर पोहचले, जे मागील सत्रात 406.55 लाख कोटी रुपयांवर होते. म्हणजेच, आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.99 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली.

बाजाराची आजची स्थिती
आजच्या व्यवहारात ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल, एनर्जी, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस सेक्टरचे शेअर्स वाढीसह बंद झाले, तर बँकिंग आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली. निफ्टी मिडकॅप निर्देशांक आणि स्मॉल कॅप निर्देशांकही हिरव्या रंगात बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 18 वाढीसह बंद झाले तर 12 घसरले. 50 निफ्टी शेअर्समधील 28 शेअर्स वाढले, तर 22 घसरले. 

वाढणारा आणि घसरणारा शेअर
आजच्या व्यवहारात ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. आरईसीचे शेअर्स 9.22 टक्के, पॉवर फायनान्स 5.96 टक्के, ट्रेंट 5.37 टक्के, चोला इन्व्हेस्टमेंट 9.08  टक्के, डाबर इंडिया 3.46 टक्के, इंडिगो 3.16 टक्के, आयसीओ 2.69 टक्के वाढीसह बंद झाले. तर, पीएनबी 2.13 टक्क्यांनी, गेल 1.94 टक्क्यांनी, अदानी एनर्जी 1.16 टक्क्यांनी घसरले.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Stock Market Closing On 2 May 2024: Stock market boom; Total market cap at a record high of Rs 408.54 lakh crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.